Share

साहित्य संमेलन कुठल्या दिशेन;अभिव्यक्ती स्वातंत्र्याला स्थान आहे का नाही?

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा:अध्यक्षपदाच्या निवडीपासून वादाच्या भोवऱ्यात असणारे ९३ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.ते म्हणजे संत साहित्याचे आकलन न झाल्यामुळे बुवाबाजी वाढतेय का? या विषयावर परिसंवाद सुरू असतांनाच व्यासपीठावर गोंधळ सुरू झाला.त्याच वेळी झी 24 तासचे रिपोर्टर मुस्तान मिर्झा यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली आहे.

काल तरुण भारत मुंबई चे सोमेश कोलगे यांना प्रतिबंधात्मक स्थानबद्दता हे कारणं देऊन अटक करण्याचा प्रयत्न झाला होता.यावरून हे साहित्य संमेलन कुठल्या दिशेने जात आहे असा प्रश्न निर्माण होतोय.

आम्ही साहित्य संमेलनाच्या विरोधात नाही.पण या ठिकाणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असेल तर ते निषेधार्ह आहे.त्याचबरोबर बाऊंसर्स त्या ठिकाणी का?हा प्रश्नही या ठिकाणी उपस्थित होत असल्याची प्रतिक्रिया मुंबई तरुण भारतचे संपादक किरण शेलार यांनी दिली आहे.त्याचबरोबर एक फादर तुम्हाला साहित्य संमेलन अध्यक्ष चालतो.मग चिकित्सा केवळ संत साहित्याचीच का?हा प्रश्नही शेलार यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!