🕒 1 min read
नवी दिल्ली : मोदींनी करोना विरोधातील लढाई लढत असलेल्या जनतेचा आत्मविश्वास वाढविण्याचा आज या कार्यक्रमात प्रयत्न केला. यंदाच्या वर्षात देशात एकामागून एक संकटं येत गेली. अशी संकटं येतचं असतात म्हणून संपूर्ण वर्ष खराब मानायची गरज नाही. वर्षभरात एक किंवा पन्नास अडचणी येऊ द्या त्यामुळे डगमगून जायची गरज नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून देशवासियांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
‘सत्ताधाऱ्यांनी बियाणे महामंडळ शेतकऱ्यांचं रक्त शोषण करणारी संस्था करून ठेवली’
कोरोनाच्या वैश्विक महामारीवर आपल्या खूपच चर्चा झाल्या. मात्र या काळात मी पाहतोय की लोक एका विषयावर जास्त चर्चा करीत आहेत ते म्हणजे हे वर्ष कधी संपेल. कोणी कोणाशी फोनवरुन संपर्क करत असेल तर त्यांच्या चर्चेलाही याच विषयापासून सुरुवात होत आहे, असं मोदी म्हणाले आहेत.
दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधानांना लक्ष्य केले आहे. त्यांनी देशाच्या रक्षण व संरक्षण याबद्दल चर्चा कधी होणार, असा सवाल त्यांनी पंतप्रधानांना केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करून हा प्रश्न विचारला आहे. राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विट करून पंतप्रधानांना चीनच्या मुद्द्यावर प्रश्न विचारले होते. ते म्हणाले होते की, ‘देशातील जनतेला पंतप्रधानांकडून ‘सत्य’ ऐकायचे आहे असे म्हटले होते.
कब होगी राष्ट्र रक्षा और सुरक्षा की बात?
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 28, 2020
दरम्यान, गेल्या काही दिवसात भारत आणि चीन दरम्यान संघर्ष सुरु आहे. ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांना संबोधित केलं. यावेळी मोदींनी चीनचं नाव न घेता म्हटलं “जर कोणी डोळे दाखवेल तर त्याला डोळ्यात डोळे भिडवून उत्तर देऊ शकतो. भारताच्या संरक्षणासाठी आम्ही काहीही करु शकतो.”
संतांच्या पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यासाठी इन्सीडेंट कमांडरच्या नेमणूका
मोदींनी चीनचा थेट उल्लेख टाळल्याने कॉंग्रेसने मोदींवर टीकास्त्र सोडले काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी एक ट्वीट करुन म्हटलं की, “जर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बात ऐवजी लडाख की बात केली असती तर बरं झालं असतं. गलवान खोऱ्यात जे काही झालं त्यानंतर पंतप्रधानांनी चीनचा उल्लेखही केलेला नाहीये हे खूपच आश्चर्यकारक आहे”.
मोदी चीन प्रश्नावर गप्प का?
Sh @narendramodi Ji, for once, instead of 'Mann ki baat', you should deliver 'Ladakh ki baat', why you are not citing the name of 'China' in any of your addresses since intrusion, transgression and occupation are committing by China, why are you playing silence upon China?
— Adhir Chowdhury (@adhirrcinc) June 28, 2020
काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी म्हणाले, एकदा तुम्ही मन की बात ऐवजी लडाखबद्दल बोलले असते तर चांगलं झालं असतं. घुसखोरीनंतर सुद्धा तुम्ही एकदाही चीनचे नाव घेतलं नाही. चीनच्या नावावर तुम्ही मौन का ठेवलं आहे? आज पूर्व लडाखमध्ये जे काही घडत आहे त्याची उत्तरे देशाला हवी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचं थेट नाव घेण्यापासून का टाळत आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
