Share

सेल्फी विथ खड्डे कार्यक्रम कधी सुरु करायचा? भाजपा खासदाराचा सुप्रिया सुळेंना खोचक सवाल

Published On: 

जळगाव : राज्यातील रस्त्यांची अवस्था बघितल्यानंतर खड्डे आणि राज्यातील रस्ते यांचं वर्षानुवर्षे अतूट नातं आहे कि काय? असा प्रश्न आपल्या मनात उभा राहतो. अनेक सरकार आले व गेले मात्र शहरासह ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था मात्र बिकटच आहे. अनेक वेळा रस्त्यांचं वेगवेगळ्या योजनेअंतर्गत काम केलं जात. मात्र, पावसाळा आला कि परिस्थिती पूर्वी सारखीच होते.

अनेक वेळा तर रस्त्यात खड्डे कि खड्डयात रस्ते? अशी टीका देखील केली जाते. यंदाच्या वर्षी कोरोना महामारीच्या संकटाची मोठी भर पडली. त्यामुळे नागरिकांना उद्भवणाऱ्या इतर समस्यांवर दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतच रस्त्यांची अवस्था जर बिकट होत असेल तर अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांच्या अवस्थेला कोण दाद देणार.

हे गणराया… जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल कर – शरद पवार

यावरूनच आता जळगावचे भाजपा खासदार उन्मेष पाटील यांनी ट्विट करत रस्त्याच्या समस्येकडे लक्ष वेधून घेतले आहे. महायुतीचे सरकार राज्यात असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी सेल्फी विथ खड्डे मोहीम राबवत तत्कालीन सत्तेतील पक्षांचे लक्ष वेधत रस्त्यांची दयनीय अवस्था मांडली होती. यानंतर आता, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून राष्ट्रवादी काँग्रेस देखील सत्तेत सहभागी आहे.

दत्तू भोकनळ यांना अर्जुन पुरस्कार हा अहमदनगर जिल्ह्याचा सन्मान- थोरात

त्यामुळे, खासदार उन्मेष पाटील यांनी सद्याच्या रस्त्यांच्या अवस्थेवरून सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. ” राज्यातील सगळे खड्डे संपले की काय? ह्या ताई अजूनही बाहेर पडल्या नाहीत म्हणून म्हटले…सुप्रिया सुळे ताई ‘सेल्फी विथ खड्डे’ कार्यक्रम कधी पासून सुरू करायचा??”, असा खोचक सवाल देखील ट्विटरद्वारे केला आहे. आता उन्मेष पाटील यांच्या या आव्हानाला राष्ट्रवादी काँग्रेस कशा पद्धतीने उत्तर देणार हे देखील महत्वाचे आहे.

कोरोनाकडे संकट म्हणून नव्हे संधी म्हणून बघा -हसन मुश्रीफ

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!