क्रिकेट : सचिन तेंडुलकर आणि माजी कर्णधार सौरव गांगुलीबरोबर जेवणाचा आस्वाद घेत असल्याचा जुना फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे. तर मिडीयावर या फोटोची जोरात चर्चा होत आहे. त्यानंतर सचिन तेंडुलकरने स्वत: गुरुवारी आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा फोटो पोस्ट करून त्याशी संबंधित आठवणी शेअर केल्या.
हा फोटो 2000 सालचा आहे किंवा त्याही पूर्वीचा आहे. सचिनला वेगवेगळे पदार्थ किती आवडतात हे आता आपणास ठाऊक आहे, पण जेव्हा या फोटोत सौरवच्या घरात पाहिल्याप्रमाणे, इतक्या प्रेमाने जेवण दिले जाते आहे की सचिनचं काय दुसरा कोणी ही याचा आस्वाद घेण्यास मागे सरणार नाही. या फोटोत सौरव गांगुलीची आई देखील आहे. तर सचिन येणार आहे म्हणून सगळे कुटुंब सचिनच्या पाहुणचारासाठी उपस्थित असल्याचं दिसत आहे.

हा फोटो पोस्ट करत सचिनने लिहिले की, ही एक सौरव गांगुलीच्या घरातली संध्याकाळ आहे. त्या संध्याकाळी मला उत्तम जेवण आणि चांगले पदार्थ खायला मिळाले. आशा आहे की तुमची आई चांगली आहे आणि मी तिला शुभेच्छा देतो.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

