Share

गोपीनाथ मुंडेंप्रमाणे पंकजा मुंडेही वंचीतांना न्याय देतायतं : अमित शहा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : विजयादशमी निमित्त आज बीड येथील सावरगावात ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृवात भव्य दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा देखील उपस्थित होते. या भव्य मेळाव्याला संबोधित करताना अमित शहांनी राजकीय भाष्य करणे टाळले आहे. केवळ दसऱ्याच्या शुभेच्छा देयला आलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी अमित शहा म्हणाले की, गोपीनाथ मुंडेंप्रमाणे पंकजा मुंडे देखील वंचीतांना न्याय देत आहे. 70 वर्ष OBC समाजाला आधीच्या सरकारने केवळ आश्वासन दिल मात्र पंतप्रधान मोदींच्या सरकारने न्याय दिला. त्याच प्रमाणे पंकजा मुंडेंनीही OBC आयोग कडून संपूर्ण समाजाला न्याय दिला. वंचितांचा विकास पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वातील सरकार करत आहेत, असे शहा म्हणाले.

अमित शहांनी या मेळाव्यात ही कलम 370 वर भाष्य केले. 370 हटवल्या पाहिजे होत ना असा सवाल अमित शहांनी यावेळी विचारला.तसेच आज मी राजकीय भाषण करायला आलेलो नाही. मात्र निवडणुकीच्या प्रचारावेळी येईल तेव्हा छाती ठोकून दोन हात करणार आहे, असे ते म्हणाले.

विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्या दृष्टीने या मेळाव्याला मोठे महत्व प्राप्त झाले होते. या मेळाव्यातून अमित शहा निवडणुकीच्या तोंडावर कोणत्या विषयांना हात घालणार. यावर अनेकांचे लक्ष लागले होते. या मेळाव्याला भाजप नेते पंकजा मुंडे , प्रीतम मुंडे, भूपेंद्र यादव, राधाकृष्ण विखे पाटील , सुजय विखे पाटील, राम शिंदे, ओमराजे निंबाळकर, आदि मान्यवर उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

https://twitter.com/Maha_Desha/status/1181477043160018946?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181458804342284289?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1181450463389995008?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!