🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – कॉंग्रेस आघाडीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी राज्यावर आलेल्या ओल्या दुष्काळाच्या संकटावर राज्यपालांनीच लक्ष घालावे अशी मागणी महाआघाडीच्या प्रमुख नेत्यांनी केली. या भेटीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात , जयंत पाटील, छगन भुजबळ, शरद रणपिसे आदि नेते उपस्थित होते.
यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ‘मागे खासगी कंपन्यांनी विम्याची नफेखोरी केली होती. मात्र यावेळी सरकारने ती मदत मिळवून दिली पाहिजे, असे थोरात म्हणाले. मागील पूर परिस्थितीत ६८०० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा झाली ती मदत अद्याप मिळालेली नाही. आता यावी जाहीर केलेली दहा हजार कोटींची मदत कधी मिळणार? असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.
दरम्यान, यावेळी आघाडीच्या नेत्यांनी सरकारने परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत, शेतकऱ्यांचे पीक कर्ज व वीज बिल माफ करावे, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५० हजार रुपये मदत करावी. द्राक्ष बागांसह फळबागांचे व भाजीपाल्याचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टर १ लाख रुपये मदत द्यावी.
पशूधन व घरांची पडझड झाली आहे त्याचे पंचनामे तात्काळ करून मदत करावी, रब्बीच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना बी-बियाणे व खतं मोफत द्यावीत. राज्यातील ७५० किलोमीटरच्या सागरी किनारपट्ट्यातील मच्छिमारांचेही नुकसान झाल्याने त्यांच्या रोजी-रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्याबाबतही राज्यपालांनी आवश्यक त्या सूचना सरकारला कराव्यात अशा मागणीचे पत्र राज्यपालांना दिले.


महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1191728519463788546?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191724931723251712?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1191722059358818314?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
