🕒 1 min read
नागपूर : कोरोनाची बाधा झाल्याचे माहिती असल्यानंतरही महिला आणि तिच्या नातेवाईकांनी पसार होण्याची योजना आखली. काहीही करून येथून निसटायचेच असे ठरले अन् रुग्णालयातूनच त्यांनी पळ काढला. रविवारी संघमित्रा एक्स्प्रेसमध्ये बसले पण रेल्वे सुरक्षा दलाने तडकाफडकी सर्व ५ जणांना बैतुल स्थानकावरच उतरविल्यानंतर प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला.
चार दिवसांपूर्वी सिकंदराबाद-दानापूर एक्सप्रेसने एका परिवारातील पाच जण रेल्वेने नागपुरात आले. महिलेला प्रसव पिडा असल्याचे तिला रुग्णालयात दाखल करण्यात होते. दरम्यान, कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने महिलेला शहरातील एका रुग्णालयातील कोविड वॉर्डात भरती करण्यात आले. तिच्यासोबतच्या नातेवाईकांपैकी दोघांचा अहवालही पॉझिटिव्ह आला होता, यामुळे तेसुद्धा येथे भरती होते. रविवारी संघमित्रा एक्स्प्रेस या गाडीतून कोरोना पॉझिटिव्ह महिलेसह पाचजण पसार झाले. ते सर्व दानापूरला जात होते.
मातोश्रीवरील धमकीनंतर आता शरद पवारांना धमक्यांचे फोन
यातील तीनजण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. सकाळी ८.२0 वाजताच्या सुमारास नागपूरवरून सुटणारी संघमित्रा एक्स्प्रेस पकडण्यासाठी ते लगबगीने निघाले. गाडी येण्यापूर्वीच स्थानकावर पोहोचले. यापैकी एकालाही तीव्र ताप किंवा कोरोनाचे इतर लक्षण नसल्याने स्थानकावर लावण्यात आलेली ऑटोमॅटिक तिकीट चेकिंग-मॅनेजिंग अँक्सेस (आत्मा) मशिन त्यांना पकडू शकली नाही. दरम्यान, मेयो रुग्णालयाच्या कोविड सेंटरमधूनच हे पाच रुग्ण पळाल्याची चर्चा रंगली होती. मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांनी मात्र याला नकार दिला. शहरातील अन्य कोविड सेंटरमधील हे रुग्ण असावे, असे त्यांनी सांगितले.
ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
