Share

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण…

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे : राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीला शहरात पसरणारा कोरोना विषाणू आता गाव खेड्यातही फोफावतोय. सामान्य नागरिकांसोबत राजकीय नेते व लोकप्रतिनिधींनाही कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. आता नगरविकास राज्यमंत्री व राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.

राज्य विधानसभेचे दोन दिवसांचे अधिवेशन चालू असतानाच राज्यमंत्री प्राजक्त तनुपरे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. विधानसभा अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक आमदाराला कोरोनाची चाचणी बंधनकारक केली आहे. त्यानुसार काल प्राजक्त तनपुरे यांनी आपली कोरोना चाचणी करून घेतली.आज अहवाल आला असून,त्या अहवालानुसार ते कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.

‘सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या. कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार’ अस ट्विट करत तनपुरे यांनी कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन ?

सतत फिल्डवर आहे, लोकांच्या संपर्कात आहे. कितीही बचाव केला तरी शेवटी काल केलेल्या कोरोना चाचणीत रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. तब्येत अगदी व्यवस्थित आहे, काळजी करण्याचे कारण नाही. मी स्वतः काळजी घेत आहे. आपणही स्वतःची काळजी घ्या, कोरोनाला हरवून लकवरच तुमच्या सेवेत पुन्हा रूजू होणार, असे ट्वीट प्राजक्त तनपुरे यांनी केले आहे. अलीकडच्या काही दिवसांत त्यांनी अनेक कार्यक्रमांना हजेरी लावली असल्यामुळे भीती व्यक्त करण्यात येत आहे.

उपजिल्हा रुग्णालयाची कार्यवाही वेगाने करावी- स्नेहलता कोल्हे

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!