मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीला उडवून देण्याच्या धमकीला एक दिवस उलटत नाही तर, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांंना धमकी आल्याची माहिती समोर येत असून याबाबत गृहमंत्रालयाच्या सुत्रांनी माहिती दिली आहे. हे फोन बाहेरच्या देशातून होते अस त्यांच म्हणणं आहे.
दरम्यान कंगणा रणौतवर गृहमंत्र्यांनी टिप्पणी केल्यानंतर हे असे फोन येत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरक्षा यंत्रणा करत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहीती नुसार हे फोन कॉल दुबईहून आले होते. फोन करणारी व्यक्ती दाऊद इब्राहिमच्या नावाने धमकी देत होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास्थान बाँम्बने उडवून देण्याची धमकी देणारी व्यक्ती कोण आहे? दुबईहून फोन कॉल मातोश्रीच्या लँडलाईनवर कुणी केला याचा तपास आता सर्व सुरक्षा यंत्रणा करत आहेत.
ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण…
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबई वरून अज्ञानमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री निवास्थानावर दुबई वरून अज्ञात व्यक्तीने दुबई वरून फोन करून धमकी दिली होती.
अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात पुन्हा लॉकडाऊन ?


