नांदेड : विदर्भातून हैदराबादकडे काळ्याबाजारात विक्रीसाठी नेला जात असलेला स्वस्त धान्याचा ३४१ क्विंटल गव्हाचा ट्रक पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी नांदेड जिल्ह्यातील पोलिसवाडी भागातील तिघांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शनिवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. विदर्भातून स्वस्थ धान्याचा गहू हा खरेदी करुन हैदराबादला विक्री करण्यात येतो अशी माहिती स्थानिक पोलीसांना मिळाला होता.
स्वस्त धान्य दुकानातील गहू एका ट्रकमध्ये भरून विदर्भातील मंगरूळपीर येथून हैदराबादकडे जात असल्याची माहिती हिंगोलीच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यावरून पोलिसांच्या पथकाने गुरुवारी मध्यरात्री हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर वाहन तपासणी सुरू केली. यामध्ये मध्यरात्री एक ट्रक पोलिसांनी थांबविला. ट्रकचालक किशोर नागोराव धुळगुंडे याच्याकडे चौकशी केली असता त्याने ट्रकमध्ये गहू असल्याचे सांगितले. तसेच गव्हाच्या मंगरूळपीर बाजार समितीच्या पावत्या देखील दाखवल्या.
मात्र पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी सदर ट्रक व चालकास ताब्यात घेतले. या ट्रकमध्ये ३४० पोत्यांमध्ये भरलेला ३४१ क्विंटल गहू आढळून आला. शुक्रवारी मंगरूळपीर बाजार समितीच्या सचिवांनी त्या पावत्या बाजार समितीच्या नसल्याचे सांगितले. पोलिसांनी ट्रकचालक किशोर धुळगुंडे यास शनिवारी हिंगोलीच्या न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याची सोमवारपर्यंत (ता.७) पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. त्याने विदर्भातून घेतलेला गहू हैदराबादकडे नेला जात असल्याचे प्राथमिक चौकशीत सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘भाजपची सत्ता असती तर हिंदूंचा अपमान करणाऱ्या या टोळक्यांच्या मुसक्या आवळल्या असत्या’
- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने झालेल्या दुर्घटनेत १०० ते १५० नागरिक मृत्यू पावल्याची भीती
- ‘जय श्रीरामच्या’ घोषणेनंतर ममतांनी नाकारले मोदींसोबत पुन्हा एका मंचावर येणे
- “कृषी मंत्री असताना पवारांनी शेती सोडून IPL स्पर्धा भरवलेल्या चालतात पण…
- एकमेकांना संपवण्याची भाषा करणारे बसले मांडीला मांडी लावून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

