मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनचा आज ७५ वा दिवस आहे. शेतकरी आंदोलनाची दखल आता जागतिक पातळीवर घेण्यात येत असून पॉप स्टार रिहाना व पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलकांच्या समर्थनार्थ भूमिका मांडली. मात्र या दोन्ही सेलिब्रिटींनी मांडलेल्या भूमिकेनंतर भारतीय क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांनी ‘भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये ढवळाढवळ करू नये’ अशी एकमुखी भूमिका मांडली.
सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने देखील अशीच भूमिका मांडली होती. मात्र यानंतर सचिनला सोशल मीडियावर मोठा विरोध करण्यात येतोय. शेतकरी आंदोलनाबाबत इतक्या दिवसांपासून शांत बसलेला सचिन रिहाना व ग्रेटाच्या ट्विटनंतर जागा झाल्याने नेटकरी चांगलेच भडकलेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सचिनला मोलाचा सल्ला दिला आहे.
पत्रकारांशी संवाद साधत असताना शरद पवार म्हणाले, ”लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकरांच्या प्रतिक्रियांवर अनेक सामान्य लोक तीव्र पणे होत आहेत. आपले क्षेत्र सोडून बाकी विषयांवर बोलताना काळजी घ्यावी असा माझा सचिनला सल्ला राहील’ असं म्हंटल आहे .
यावरून आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शरद पवारांवर जोरदार निशाणा साधला आहे. “कृषी मंत्री असताना आपलं शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात. पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपलं मत मांडलं ते ‘राष्ट्रवादी’ काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नाही,” असं म्हणत भातखळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून पवार यांच्यावर निशाणा साधला.
"आपलं क्षेत्र सोडून इतर विषयांवर बोलताना…"; शरद पवारांचा सचिन तेंडुलकरला सल्ला…
कृषी मंत्री असताना आपलं शेती क्षेत्र सोडून क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धा भरवलेल्या चालतात पण सचिनने राष्ट्रहिताच्या बाजूने आपलं मत मांडलं "राष्ट्रवादी" काँग्रेसच्या अध्यक्षांना चालत नाही… pic.twitter.com/nPPPMtF3qA— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 6, 2021
महत्वाच्या बातम्या


