कोलकाता: निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. टीएमसीचे आमदार दीपक हल्दर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
गेल्या १५ दिवसांपूर्वी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये कोलकाता येथे विक्टोरिया मेमोरियल मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हे एकाच मंचावर आले होते. या कार्यक्रमात ममता बोलण्यासाठी उभ्या राहताच तेथे उपस्थित असलेल्या काही लोकांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणा द्यायला सुरुवात केली होती. यावरून ममता प्रचंड संतापल्या होत्या. यावेळी त्यांनी भाषण करण्यास नकार देत, पंतप्रधानांसमोरच रागही व्यक्त केला होता.
तर नुकतच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी बंगाल ला भेट दिली होती त्यांनतर आता पुन्हा पंतप्रधान मोदी बंगालला जाणार आहेत. निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदी बंगाल आणि देशाला काही भेटही देणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे, की ‘मी हल्दिया, पश्चिम बंगालमध्ये असेल. तेथे बीपीसीएलकडून तयार करण्यात आलेल्या एलपीजी इंपोर्ट टर्मिनलला देशासाठी समर्पित करणार आहे. याशिवाय पंतप्रधान ऊर्जा गंगा प्रोजेक्ट अंतर्गत दोभी-दुर्गापूर नॅचरल गॅस पाइपलाइन सेक्शनदेखील देशाला समर्पित करेल.’ यावेळी मोदी हल्दिया रिफायनरी शिवाय इतर प्रकल्पांचेही उद्घाटन करणार आहेत.
दरम्यान, हल्दिया येथे पंतप्रधान मोदींचा सरकारी कार्यक्रम आहे. सरकारी प्रोटोकॉलनुसार, या कार्यक्रमात पोहोचण्यासाठी ममतांनाही निमंत्रण पाठवण्यात आले आहे. मात्र, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी या सरकारी कार्यक्रमादरम्यान उपस्थित राहणार नाहीत, असे त्यांच्या कार्यालयने पीएमओला कळवले आहे. मागच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी त्यांनी हे निमंत्रण नाकारले आहे.
महत्वाच्या बातम्या
- माधुरी-आमिर पुन्हा येणार एकत्र; दिल चित्रपटाचा लवकरच रिमेक
- पँथरची पुर्वीपेक्षाही आजची आवश्यकता जास्त- रमेश खंडागळे
- डिजिटल पेमेंट युजर्स साठी महत्वाचे ‘हे’ पेमेंट अॅप होतेय बंद !
- माधुरीच्या ‘धकधक’ गाण्यावर अंकिताचा हॉट डान्स; व्हिडीओ व्हायरल
- आम्ही शरजील उस्मानी सोबत आहोत; एल्गार परिषदेच्या आयोजकांचा पुनरुच्चार


