Share

व्हॉट्सअॅप  अॅडमिनच्या अधिकारात आणि डोकेदुखीत होणार वाढ ? 

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा- अँड्रॉइड आणि विंडोज फोनमध्ये व्हॉट्सअॅप लवकरच ‘रिस्ट्रिक्ट ग्रूप’ नावाचं फीचर आणणार असल्याचं कळतं. या फीचरमुळे फक्त ग्रूप अॅडमिनलाच ग्रूपमध्ये परवानगीविना मेसेज पाठवता येईल. इतर सर्व सदस्यांना मेसेज, फोटो, व्हिडिओ, जिफ, डॉक्युमेंट किंवा व्हॉइस मेसेज पाठवण्यासाठी अॅडमिनची परवानगी घ्यावी लागणार आहे.

2.18.132 या अँड्रॉइड व्हर्जनमध्ये ‘अॅडमिन सेटिंग्स’ नावाचा पर्याय ग्रूप इन्फोमध्ये समाविष्ट केला जाईल. तिथून ग्रूप अॅडमिन सदस्यांना ‘रिस्ट्रिक्ट’ करू शकेल. त्यानंतर, या सदस्यांना फक्त ग्रूपवरचे मेसेज वाचता येतील. त्यांना ग्रूपवर एखादी पोस्ट करायची असेल तर ‘मेसेज अॅडमिन’ हे बटण वापरून आधी तो मेसेज अॅडमिनला पाठवावा लागेल आणि त्यानं ‘अॅप्रूव्ह’ केल्यावरच तो ग्रूपवर दिसू लागले.

व्हॉट्सअॅप ग्रूपवरून पसरवल्या जाणाऱ्या अफवा, चुकीची माहिती किंवा समाजात तणाव निर्माण करणाऱ्या मेसेजना काही प्रमाणात आळा घालणं या फीचरमुळे शक्य होणार आहे.  हे सगळं ‘रिस्ट्रिक्ट’ करण्यासाठी ‘रिस्ट्रिक्ट ग्रूप’ फीचर फायद्याचं ठरू शकतं. पण, या फीचरमुळे अॅडमिनची डोकेदुखी वाढणार आहे कारण मेसेज अॅप्रूव्ह केला नाही तर अजूनच वाद होण्याची शक्यता आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!