Share

पुलवामा हल्ला होत असताना सुरक्षा यंत्रणा काय करत होती, ओवेसी यांचा पंतप्रधान मोदींना सवाल

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक पक्ष आता जनतेला आपण किती जनतेच्या हिताचे आहोत आणि सरकार किती तकलादू आहे हे सांगण्यासाठी बाहेर पडत आहेत. त्यामुळे आता या निवडणुकीच्या धामधुमीत जनतेला अनेक विराट सभा आणि आश्वासन ऐकायला मिळणार आहेत. अशीच वंचित बहुजन समाजाची विराट सभा शनिवारी सायंकाळी दादर शिवाजीपार्क येथे पार पडली. यावेळी एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुलवामा हल्ला होत असताना सुरक्षा यंत्रणा काय करत होती असा करडा सवाल विचारला तर प्रकाश आंबेडकरांनी हे सर्व राजकीय पक्षातील नेते मिळेल तेथे जमीनी घशात घालत आहेत . त्यामुळे येथील स्थानिक बांधवांना जमिनी मिळत नाहीत. अशी टीका केली.

यावेळी असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, पुलवामा येथे झालेला भ्याड हल्ला हा पाकिस्तानकडून करण्यात असून या हल्ल्यात पाकिस्तान सरकार, आयएसआय, दहशतवादी यांचा हात आह्रे. त्यामुळे पाकिस्तान आता कितीही आमचा या हल्ल्यात हात नाही असे म्हणत असले तरी आमचा त्यावर विश्वास नाही. यावेळी ओवेसी यांनी पाकिस्तानच्या एका मंत्र्याला चांगलेच प्रती उत्तर दिले. ओवेसी उत्तरा दाखल म्हणाले की जोवर मुस्लीम आहे तोवर मशिदींतून अजान, मंदिरांतून घंटानाद, चर्च, गुरुद्वारांमधून प्रार्थनेचे सूर उमटत राहतील. जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा आम्ही सर्व एक असतो. त्यामुळे पाकिस्तानी नेत्यांनी भारताच्या मुस्लिमांची काळजी करू नये.

दरम्यान प्रकाश आंबेडकरांनी सर्वच राजकीय पक्षातील नेते मिळेल तिथे जमिनी खात सुटले आहेत. अशी टीका केली. तसेच भाजपला वंचित बहुजन समाज आघाडीने आम्ही तुम्हाला मदत करू. पण त्यासाठी तुम्ही शिवसेनेला सोडाल का? अशी ऑफर देखील दिली. यावेळी मंचावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी , प्रकाश आंबेडकर , न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!