Share

बालक चपळ व सुदृढ होण्यासाठी काय कराल

Published On: 

🕒 1 min read

वेब टीम- नवजात अर्भकाचे छोट्या मुलामध्ये रूपांतर होताना नाना टप्पे ओलांडावे लागतात. इंग्रजीत त्याला चळश्रव डीेंपश म्हणतात. बाळ अजून पालथे पडतच नाही? रांगतच नाही? वर्ष होत आले बाळ अजून उभे राहतच नाही? किंवा ते मम्मी-पप्पाचे कान, बाळाचे बोल ऐकण्यासाठी आतुरलेले असतात ते बोलही बाळ उच्चारत नाहीत! किंवा दात येताना सर्व घरादाराला दमछाक आणते ते बाळ! तास, अर्धा तासाला जर बाळ शी-जुलाब, उलटी करत असले तर गप्प बसून चालत नाही.

अ) दात येण्याच्या सुरुवातीच्या काळात म्हणजेच बाळ सहा महिन्याचे झाल्यावर हिरड्या सळसळतात व मुले हाताला येईल ती वस्तू चघळतात. त्यामुळे इन्फेक्शन होऊन जुलाब-उलट्याचा त्रास होतो. होमिओपॅथिक चामोमिला, कळकेरीया फॉस, कलकेरिया कार्ब, सिलीसीया, कोलोन्सिया औषधे उपयोगी पडतात.

ब) काही नवजात बालकांना मातेचे दूध पचत नाही, जुलाब-उलटी होते. तर यामध्ये बाळाच्या आतड्याची कार्यक्षमता इथूजा होमिओपॅथिक औषधांनी सुरळीत सुरू होऊन बाळ मातेचे दूध पचवू शकते.

क) रात्री बाळ खूप रडते. बहुदा पोटात गॅस होणे, लघवीच्या जागेचे इन्फेक्शन बाळाला दुपट्यात खूप घट्ट बांधून ठेवल्याने, मुंगी, डास चावल्याने रडण्याची शक्यता आहे. मातेने दूध पाजून झाल्यावर बाळाची ढेकर काढणे आवश्यक आहे. तर कधी पोट नीट भरले नसेल तरही बाळ खूप रडते. औषधे : कोलोसिंथ, बलडोना, नक्स व्हेमिका, कलकेरिया कार्ब, चामोमील इ. औषधे उपयोगी.

ड) काही मुलांमध्ये हे चळश्रव डीेंपश लवकर (वाढ) होतात; पण नैसर्गिक वाढीला जास्तच वेळ जात असेल तर मात्र ढिले राहून चालणार नाही. मुलांचे स्नायू व हाडे कमकुवत असण्याची शक्यता असते. त्यांचा स्वत:चा तोल सांभाळण्याची ताकद, शक्ती कमी पडते किंवा जर स्थूल शरीर असेल तरी स्वत:चा तोल सांभाळणे कठीण जाते. यावर होमिओपॅथिक औषधांचा फायदा होतो. औषधे : सिलीसिया, फॉस्फरस, नॅट्रममुर, बरायटा कार्ब, चामामील, कलकेरिया फॉस, कलकेरिया कार्ब इ. अनेक.

ई) बोलणे हे मुलांच्या जीभेच्या ठेवणीवर व स्वरयंत्राच्या रचनेवर अवलंबून
असते. कोणाची जीभ अरूंद व जाड असते, अनुवंशिक असते, कधी खाली चिकटलेली असते. तर कधी स्वर यंत्रावर सूज येत असते. इ. अनेक कारणे मुलांच्या स्पष्ट बोलण्यामध्ये बाधा आणतात. तर यावरील जीभेच्या स्वरयंत्राच्या व पर्डाजीभेच्या त्रुटी होमिओपॅथिक औषधांनी सुधारतात. कॉस्टीकम, बुफो, बेलडोना, लॅकेसिस, सिना इ. औषधे आहेत; पण ती होमिओपॅथिक तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानेच घ्यावीत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!