मुंबई : इन्कमटॅक्स विभागाने पश्चिम महाराष्ट्रातील चार मोठ्या साखर कारखान्यांवर छापा टाकला आहे. अजित पवारांचे नातेवाईक म्हणून जर धाड टाकली असेल तर कुठल्या स्तरावर जाऊन या वेगवेगळ्या संस्थांचा वापर केला जातोय त्यामुळे राज्यातील जनतेने या गोष्टीचा विचार जरूर केला पाहिजे असे स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मांडले आहे. त्यावर आता भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी अजित पवारांवर टीका केली आहे.
अजित पवार गेल्या अनेक महिने झाले माझ्या प्रश्नाचं उत्तर देत नाहीत की, जरंडेश्वर साखर कारखान्याचा खरा मालक कोण आहे?, कोणी विकत घेतला किती रुपयांत विकत घेतला तुम्ही बेनामी कारभार केलाय. जर अजित पवारांनी बेनामी कारभार केलाय तर त्यांना उत्तर द्यावच लागणार. आज म्हणत आहेत माझा परिवार, माझी लोक मग राज्यातील जनता कोणाचा परिवार आहेत. तुमच्या घराला काय ठेका दिलाय का महाराष्ट्राला लुटायचा? ठाकरे-पवार घोटाळेबाज सरकार हे गेल्या दिड वर्षे महाराष्ट्राला लुटुन खाल्ल कारवाई तर होणारच, असं म्हणत सोमय्यांनी अजित पवार आणि ठाकरे सरकरावर ताशेरे ओढले आहे.

अजित पवारांना आता साखर कडू वाटायला लागलीय का? ज्यावेळी शेतकऱ्यांच्या मेहनतीची कमाई, जमिनी दिल्या, भागदार बनल्या, हजारो शेतकऱ्यांचे कारखाने पवार परिवार जेव्हा लुटत होते तेव्हा त्यांना कुटुंब आठवलं का? आज ज्या धाडी आहेत त्या सिस्टमचा भाग आहे. काल मी शेतकऱ्यांना भेटलो. पारनेरमध्ये शेतकऱ्यांना भेटलो तेव्हा शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आमच्या जमिनी पवार कुटुंबाने आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ढापल्या, असं किरीट सोमय्या म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अजितदादांना आता साखर कडू वाटायला लागलीय का?; किरीट सोमय्यांचा तिखट सवाल
- धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे भाविकांसाठी झाली खुली; ‘या’ नियमांचे करावे लागणार पालन
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- राज्यावर, देशावर असलेले हे कोरोनाचे संकट दूर होउदे; छगन भुजबळ यांची सप्तश्रृंगी मातेच्या चरणी प्रार्थना
- निवृत्त न्यायाधीश करणार लखीमपूर हिंसाचार प्रकरणाचा तपास; दोन महिन्यांची डेडलाईन