Share

‘अदानी मुंद्रा बंदरावर ३००० हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले ?’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात सध्या ड्रग्ज माफियांवर होत असणाऱ्या कारवाया हा चर्चेचा मुद्दा बनला आहे. नुकतेच अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला देखील ड्रग्ज संदर्भात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान, अटक करण्यात आलेली आहे. या मुद्द्यावरून खरतर एनसीबीवर कौतुकाचा वर्षाव व्हायला हवा होता मात्र या मुद्द्यावरून देखील मोठ्या प्रमाणात राजकारण होत असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक हे वारंवार तपास यंत्रणांवर टीका करत असताना दुसऱ्या बाजूला आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील मलिक यांच्या सुरात सूर मिसळला आहे. एनसीबीच्या कारवायांबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, ते चुकीचे करतील त्यावर कारवाई झाली पाहिजे. पण अदानी मुंद्रा बंदरावर ३००० हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले. त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही.

आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमलपदार्थाच्या मोठ्या साठ्यावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी मुंबईत कारवाया केल्याचे दाखवले जात आहे. मुंबईतील एनसीबीच्या कारवाया म्हणजे ‘दाल मे कुछ काला है…’ असे वाटते. शाहरुख खानच्या मुलाला एनसीबीने अटक केली त्याला हिंदु-मुस्लीम रंग देण्याचा अत्यंत हिन प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचेही पटोले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!