Share

‘जे एका भावाला नाही जमल ते अजितदादांनी शब्दासाठी करून दाखवले…’

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या पाच शिवसेना नगरसेवकांनी मागील आठवड्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आमदार निलेश लंके यांचे समर्थक असणाऱ्या या नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षांमध्येच फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्याने विरोधकांना आयतेच टीका करण्याचे कोलीत मिळाले होते. अखेर आता राजकीय नाट्यावर पडदा पडला असून नगरसेवक पुन्हा स्वगृही शिवसेनेत परतणार आहेत.

या अडचणीच्या काळात देखील फोडाडीचे राजकारण सत्तेतीलच पक्षांत झाल्यानंतर गेल्या २ दिवस झालेल्या घडामोडींवर आता विरोधक चांगलेच संतापले असून नितेश राणे यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपल्याच भावाचे 7 नगरसेवक फोडणाऱ्यांना या 5 जणांना परत घेताना तरी लाज वाटेल का? जे एका भावाला नाही जमल ते अजित दादांनी शब्दासाठी “करून दाखवले” अशा शब्दांत एकदम मार्मिक टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर व शिवसेने वर केली आहे. शिवसेनेने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मुंबईतील ७ नगरसेवकांना फोडले होते याची आठवण देखील करून देत, राष्ट्रवादीमध्ये गेलेले ५ नगरसेवक परत घेण्याच्या या घडामोडींवर त्यांनी भाष्य केले आहे.

याआधी नितेश राणे यांचे बंधु निलेश राणे यांनी केलेल्या ट्विट मध्ये म्हणतात, ‘या अशा कारणांमुळेच सामान्य लोकं राजकारण्यांवर फक्त थुंकायचे शिल्लक राहिलेत. संकटांचा डोंगर समोर दिसताना सुद्धा सत्ताधारी लंगडी खोखो खेळतायत’ , अशा शब्दांत टीका करत असतानाच हे कसं घडलं अशी विचारणा देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा माघारीचा निर्णय झाला आहे. हे सर्व नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर पोहोचले आहेत.

मधल्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली होती. त्यावेळीही हा विषय निघाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर आज या पाचही नगरसेवकांना मुंबईत बोलावून घेण्यात आले. मंत्रालयात अजित पवार, मिलिंद नार्वेकर नीलेश लंके यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यानंतर त्यांना मातोश्रीवर पाठविण्यात आले. शिवसेनेच्या तालुका महिला आघाडी प्रमुख उमा बोरुडे, नगरसेवक विजय वाघमारे, माजी आमदार विजय औटी, आनंदा औटी, साहेबराव देशमाने, जितेश सरडे हेही मातोश्रीवरील बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळाली. तिथं त्या पाच नगरसेवकांनी आपली बाजू मांडली असून नाराजीचे कारण स्पष्ट केले आहे. त्यावर चर्चा आणि काही उपाय सुचविल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार समन्वय ठेवण्याची जबाबदारी आता आमदार लंके आणि नार्वेकर यांच्यावर देण्यात आल्याची माहिती आहे.

या नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर त्यांना फोडल्याचा आरोप झाला. यासाठी आमदार लंके यांना जबाबदार धरण्यात आले. मात्र, यातून राष्ट्रवादी-शिवसेना संबंध बिघडत असल्याचे लक्षात आल्यावर प्रकरण मिटविण्याची जबाबदारीही लंके यांच्यावर सोपविण्यात आली. त्यानुसार लंके यांनी या हालचाली केल्या असून त्याला यश आल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिवसेनेसाठी राष्ट्रवादीचे एक पाऊल मागे ? ‘त्या’ नगरसेवकांची शिवसेनेत होणार घरवापसी

इसको बेचो उसको बेचो, कुछ ना बचे तो छप्पन इंच का सीना बेचो – कन्हैया कुमार

निकृष्ट बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल करा अन्यथा… मराठा महासंघाचा निर्वाणीचा इशारा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!