Share

हनीमूनसाठी इटलीला गेले आणि कोरोनासह भारतात परतले

Published On: 

🕒 1 min read

बंगरूळ : एकीकडे देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने सध्या सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. शासन सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र काही बेफिकीर लोकांमुळे हा आजार आणखी पसरत असल्याचे चित्र आहे.

गुगलसाठी काम करणारा कर्मचारी हनीमूनसाठी पत्नीला घेऊन इटलीला गेला होता. इटलीहून परतल्यानंतर गुगल कर्मचाऱ्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. आठ मार्चपासून कोरोनाची लागण झालेल्या महिलेनं बंगळुरु ते दिल्ली आणि दिल्ली ते आग्रा प्रवास केल्यानं तिथल्या यंत्रणांची झोप उडाली आहे.

या कोरोनाग्रस्त महिलेला बंगळुरुमध्ये एकांतवासात ठेवलं होतं. मात्र पालकांच्या घरी जाण्यासाठी तिनं बंगळुरुमधून पळ काढला आणि बंगळुरु ते दिल्ली विमानानं प्रवास केला. मग दिल्ली ते आग्रा रेल्वेनं प्रवास करत घर गाठलं.आता या महिलेच्या संपर्कात कोण-कोण आलं हे शोधून काढणे आणि त्यांच्यावर उपचार करणे हे यंत्रणाच्या समोर आव्हान आहे.

दरम्यान,कोरोना विषाणूमुळे देशात दुसरा बळी गेला आहे. दिल्लीत महिलेचा मृत्यू झालाय. तर, राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या 19 वर गेली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये बंद राहणार, दहावीची परीक्षा सुरु राहणार, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा , राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द करण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!