Share

करून दाखवलं ! नगरमध्ये पहिली कोरोना टेस्ट लॅब, आता निदानासाठी लागणारा वेळ वाचणार

Published On: 

लोणी : फक्त सहा दिवसात ‘कोविड १९ ‘ साठी नविन हाॅस्पिटल उघडणाऱ्या प्रवरा मेडिकल ट्रस्टने आता राज्यात वैद्यकिय अभिमत विद्यापीठात व अहमदनगर जिल्ह्यातील पहिली कोरोणा टेस्ट लॅब स्थापन केली आहे. राज्य शासनाची मान्यता मिळाल्यानंतर येथे कोरोणाच्या टेस्ट सुरु करण्यात येणार आहे अशी माहिती ट्रस्ट कार्यकारी अधिकारी डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी आज दिली.

सध्या कोरोणा व्हायरसच्या चाचणीसाठी पुण्याला जावे लागते , या प्रक्रियेत वेळ आणि शक्ती अधिक लागते हे टाळण्यासाठी कोरोणा चाचणीचे तंत्रज्ञान संस्थेत उभारण्यात आले. या टेस्ट लॅब मशिनच्या प्रशिक्षणास आज डाॅ राजेंद्र विखे पाटील यांच्या हस्ते सुरुवात झाली यावेळी डाॅ ते बोलतं होते. याप्रसंगी मायक्रोबायलोजीचे डाॅ शरियार रोशनी डाॅ. रविंद्र कारले व माॅलबायो कंपनीचे प्रतिनिधी विवेक अलाट व राजन गावडे हे उपस्थित होते.

या तंत्रज्ञानाच्या साह्याने राज्याच्या ग्रामीण भागांत आरोग्य सेवा देण्याचा व देशा सामोर असलेल्या या राष्ट्रीय आपत्तीत आपले कर्तव्य करण्याच्या दुष्टीने आम्ही ह्या यंत्रणा उभारल्या आहेत. या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेचे या काळखंडातील सकारात्मक पाऊल आहे.

या लॅब आधुनिक प्रकारातील असु यात एकाच वेळी चार टेस्ट घेणे शक्य होणार आहे. या लॅब मुळे कोरोणा रोज २४ तासात १२० टेस्ट करता येणार आहेत. शासनाच्या मान्यते नंतर या सेवा नागरिकांना उपलब्ध असतील. कोरोणा विरोध्दाच्या या लढाईच आम्ही सज्ज आहोतचं. पण तेव्हा इथं पर्यंत यायची वेळ तुमच्यावर येऊ नये ही इच्छा तेव्हा घरीचं रहा, सुरक्षित रहा, असे डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी पुढे बोलतांना सांगितले.

अशा प्रकारची लॅब उभारणारे प्रवरा ग्रामीण रुग्णालय देशांतील पहिले रुग्णालय असल्याचे माहिती मायक्रोबायलोजीचे विभाग प्रमुख डाॅ शरीयार रोशणी यांनी यावेळी दिली.

नाही तर लॉक डाऊन तोडून ठाण्यात दाखल होणार : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान | Shree Shivpratishthan |

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!