नाशिक: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अटक केली असून ३ मार्च पर्यंत त्यांना ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारचे नेते आक्रमक झाले आहेत. तसेच अनेक ठिकाणी निषेध आंदोलन देखील करण्यात येत आहेत. त्यात शिवसेनेचे नेते व पदाधिकारी सक्रिय सहभाग घेताना दिसत नाहीये?, असा प्रश्न पालकमंत्री छगन भुजबळ यांना विचारण्यात आला असता यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, अस काही नसून शिवसेनेचा सहभाग असतो. आदित्य ठाकरे, संजय राऊत, हे उत्तर प्रदेशामध्ये होते. भराडीदेवीचे जत्रा भरते आणि तिथे विशिष्ट कोकणातले, शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदार हे सगळे त्या भागातून आलेल्या नगरसेवक त्या दिवशी तिकडे जातात. यामुळे काही लोक आले परंतु तरीसुद्धा शिवसेनेचे आमदार आले होते.
पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, मंत्री सुभाष देसाई आले होते, महिला आघाडीच्या सदस्य आले होते. परंतु निर्णय जो आहे एकत्रित राहण्याचा, नवाब मलिक यांच्या पाठीशी राहण्याचा हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पवार साहेब आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे. नवाब मलिक यांच्यावर अन्याय होतो आहे यांच्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, असंही भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या:
Russia-Ukraine War: रशिया -भारत संबंधांबाबतीत अमेरिकेचे मोठे विधान
‘पुढच्या अधिवेशनात आम्ही मराठा अक्षणाचा…’; प्रविण दरेकरांचे आंदोलनकर्त्यांना आश्वासन
युक्रेनच्या महिला खासदाराने उचलले शस्त्र! म्हणाल्या, “मला कधीच वाटलं नव्हतं की…”
IND vs SL: भारत विरुद्ध श्रीलंका दुसरा टी २० सामना आज रंगणार
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा गंभीर इशारा ; म्हणाले…


