Share

केंद्र सरकार जाती व धर्माच्या आधारे करत असलेला भेदभाव आम्ही चालू देणार नाही

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : मुंबईमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत वाचवा, संविधान वाचवा’ फ्लॅग मार्च काढण्यात आला होता. स्थापना दिनानिमित्त केंद्र सरकार जाती व धर्माच्या आधारे भेदभाव करत आहे, आम्ही ते चालू देणार नाही. असा इशारा देण्यासाठीच या फ्लॅग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने या फ्लॅग मार्चमध्ये सहभागी झाले होते.

याप्रसंगी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, १९९८ साली जेव्हा याच पवित्र भूमीत कॉंग्रेसची स्थापना झाली, तेव्हाच निर्णय घेतला होता. सर्वांनी देशाला बरोबर घेऊन जायचं, सर्वांनी एकत्रित पद्धतीने चळवळ उभी करायची आणि देश एकत्र विविधतेने नटलेला पुढे न्यायचा. म्हणून या स्थानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

कॉग्रेसच्या स्थापनादिनानिमित्त कॉंग्रेसचे सर्वजणांनी एकत्र येत प्रतिज्ञा घेतली " देशाला पुन्हा एकदा या विचारांना एकत्र आणण्याची ताकद देण्याची गरज आहे , हा कॉंग्रेसचा विचार आहे, राज्यघटनेचा विचार आहे, त्याला ताकद देण्यासाठी संदेश जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी हा फ्लॅग मार्च काढण्यात आला आहे. आपल्या संविधानामध्ये देण्यात आलेले ते मूलभूत तत्व आहेत त्याला विरोध करणे म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याला लोकशाहीला विरोध करणे आहे.

दरम्यान, स्थापना दिनानिमित्त काँग्रेसने वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. दिल्लीत होणाऱ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, आसाममध्ये माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी वड्रा उपस्थित राहणार आहेत.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!