Share

“बाळासाहेब होते म्हणून बॉलिवूडमध्ये आम्ही सुरक्षित होतो”

Published On: 

मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दादर येथील शिवाजी पार्क मैदानावरील आयोजित रक्तदान शिबिराला शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी हजेरी लावली. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळालाही मातोंडकर यांनी वंदन केलं.

“आज मी शिवसेनेचा भाग आहे म्हणून इथं आले असले तरी बाळासाहेबांबाबत माझ्या मनात नेहमीच आदर राहीला आहे. बाळासाहेब होते म्हणून आम्ही चित्रपटसृष्टीत सुरक्षितपणे काम करू शकलो. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात बाळासाहेबांबद्दल प्रेम आहे. त्यामुळे त्यांचे विचार आणि स्वत: बाळासाहेब अजूनची आमच्यासोबतच आहेत”, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या.

“सध्याच्या वाचाळ नेत्यांमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कमी बोलून कृतीवर विश्वास ठेवणारे व्यक्ती आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या माणसाचा कृतीवर विश्वास असतो त्याची कृती आणि महाराष्ट्रासाठीची प्रगती बोलते. त्यामुळे त्यांनी कमीत कमी बोललं तरी ते लोकांपर्यंत पोहोचतं”, असं उर्मिला मातोंडकर म्हणाल्या. “कोविड काळात ज्यापद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी संयम दाखवला तो कौतुकास्पद होता. असे नेते एकंदर देशातच खूप कमी आहेत आणि त्यातले सर्वात महत्वाचे नेते हे आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आपला धर्म म्हणजे फक्त मंदिर नाही आणि सत्ता हे म्हणजे शेवटचं गणित नाही. माणसांचं आयुष्य महत्वाचं आहे हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी जे निर्णय घेतले ते मला महत्वाचे वाटतात”, असंही त्या पुढे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!