Share

पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याच्या प्रस्तावाला आमचा पाठींबा

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने १९ मार्चपासून लॉकडाऊन सुरु केले होते, गेल्या २ महिन्यापासून सुरु असलेल्या लॉकडाऊननंतर ८ जूनपासून पुनश्च हरिओम करत लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारचं पावसाळी अधिवेशन ठरवण्यासाठी आज विधिमंडळ सल्लागार समितीची बैठक विधानभवनात पार पडत आहे.

नाभिक समाजाच्या महिलांबद्दल आक्षेपार्ह टिपण्णी करणाऱ्या युवकाविरोधात कारवाईची मागणी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार यंदा अधिवेशनाचा कालावधी कमी करणार आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या ३ ऑगस्टपासून सुरु होईल, तसेच हे अधिवेशन फक्त ४ दिवस चालेल असं सांगण्यात येत आहे. मुंबईत होणाऱ्या पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचं सावट आहे. मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशातच सरकारी अधिकारी, कर्मचारी, आमदार यांना एकत्र आणून हे अधिवेशन कसं करायचं यावर बैठकीत चर्चा होणार आहे.

गौतम गंभीरने दिल्ली सरकारवर केली टीका म्हणाला, ‘दिल्ली सरकार पहिल्या दिवसापासून खोटं बोलतंंय’

त्याच पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्याचा ठाकरे सरकारचा प्रस्ताव आहे. त्याला विरोधी पक्षनेते असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिवेशन 3 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याचा सरकारचा प्रस्ताव होता, त्याला विरोधी पक्ष म्हणून आम्ही पाठिंबा दिला, शिवाय पुरवणी मागण्यांसाठी जर एखादं दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवण्याचं सरकराचं नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. कोकणात मोठं नुकसान झालंय, सरकारची मदत तोकडी आहे, महापुरावेळी निकष बाजूला ठेवून मदत केली, यावेळीही सरकारने तसंच करावं, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!