नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिवस व विजयादशमी निमीत्त संघ प्रमुख मोहन भागवत यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. आतंकवाद, सीमावाद, जम्मू – काश्मीरातील दहशतवादी हल्ला, हिंदूंचे संघटन, अंमली पदार्थ व्यापार आदी मुद्यांवर त्यांनी भाष्य केले आहे.
यावेळी मोहन भागवत म्हणाले, देशात अंमली पदार्थांचा वापर वाढत आहे. ते कसं थांबवावं माहित नाही. उच्च वर्गापासून ते खालच्या वर्गापर्यंत समाजातील सर्वच स्तरात व्यसन आहे. सीमेपलीकडील देश त्याला प्रोत्साहन देतात. या व्यापारातून येणारा पैसा कुठे जातो हे आपल्याला माहित आहे. अनियंत्रीत गोष्टी वाढत आहेत. या सर्वांवर नियंत्रण ठेवणे, ड्रग्जसारख्या व्यसनांचा पूर्ण विनाश व्हावा यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.
आपण एकाच देशाचे लोक आहोत. व्यवस्था संघराज्य आहे, लोक संघराज्य नाही. सर्व लोक एक आहेत, एक राष्ट्र आहेत. मात्र, असे पोषक वर्तन सत्तेत बसलेल्या लोकांचंही होताना दिसत नाही. मग समाजाला कुठून दिशा मिळेल? आपले राजकीय स्वार्थ साधण्यासाठी असाच छळकपट सुरू असतो. त्यात समाजाच्या मनाचं काय होणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, त्याग आणि बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र मिळवण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले. स्वतंत्र्यता का हवी यासाठीही देशात संघर्ष झाला. स्वातंत्र्यासाठी फाळणीचे दुख:ही अनुभवलं, हरवलेली अखंडता परत मिळवायची असेल तर सध्याच्या पिढीने इतिहास जाणून घ्यायला हवा. शत्रूता, भेद याची पुनरावृत्ती आता नको. मनातील भेदभावाची भावना बदलायला हवी, समाजाला तोडणारी नको जोडणारी भाषा वापरायला हवी. स्वकियांचा विसर पडल्याने भेदभाव वाढला आहे. लोकांमधील संवाद सकारात्मक असायला हवा. असेही मोहन भागवत यावेळी म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- … तर ५६ शिवसेनेचे आमदार आता भाजपसोबत असते – गुलाबराव पाटील
- महाविकासआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली – स्वाभिमानी
- या हरामखोराला भर चौकात फटके टाकले पाहिजे; निलेश राणेंचा घणाघात
- झेंडूच्या फुलांचा भाव वधारला ; फुलांच्या किंमतीत १८ ते २० टक्क्यांनी वाढ
- केंद्राची मादक पदार्थ सेवन प्रतिबंधात्मक कृती योजना राज्यात राबविणार


