🕒 1 min read
मुंबई : भारतीय खेळाडू देशातील लोकप्रिय असलेल्या आयपीएलसाठी सज्ज झालेत. येत्या ९ एप्रिल पासुन आयपीएलचे १४वे सत्र सुरु होत आहे. यावर्षीचा आयपीएलचा सलामीचा सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात होणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी सगळे संघ जोरदार तयारी करताना दिसत आहेत. प्रॅक्टिसचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील होत आहेत. यावर्षी सगळे संघ ट्रॉफी जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहेत. यावर्षी सगळेच संघ भक्कम असल्याचे दिसून येत आहे.
आयपीएलला एकच दिवस शिल्लक राहिला आहे. या आधीच विरोधी संघ प्रतिस्पर्धी संघांना धोक्याचा इशारा देताना दिसत आहेत. अशातच पंजाब किंग्जने आपल्या ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत दिसत आहे, पंजाब किंग्जचा आक्रमक खेळाडू ख्रिस गेल आपला क्वारन्टाईन काळ पूर्ण करून संघात परतला आहे.
Hum toh hai duniya ke ????????????????! ????#SaddaPunjab #PunjabKings #IPL2021 #UniverseBoss pic.twitter.com/61ZPrnHIRs
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 7, 2021
ख्रिस गेल आयपीएलच्या मैदानात धुमधडाका करण्यासाठी सज्ज आहे. पंजाबकडून खेळणाऱ्या गेलचा काल 7 एप्रिल रोजी क्वारन्टाईन पिरीयड पूर्ण झाला. पंजाब किंग्जने ट्विट करुन याबाबतची माहिती दिली. क्वारन्टाईनचा खेळ संपला. ‘द युनिव्हर्स बॉस ख्रिस गेल तुमचा फेव्हरेट ख्रिस गेल बाहेर आलाय… ‘ असे कॅपशन या व्हिडिओला दिले आहे. हा व्हिडीओ शेअर करून प्रतिस्पर्धी संघांना इशारा दिल्याचं दिसत आहे.
Quarantine da khatam khel, bahar aa gaye tuhadde favourite – Chris Gayle ????????#IPL2021 #SaddaPunjab #PunjabKings @henrygayle pic.twitter.com/rrDHPZ3lvQ
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- भारत टी-20 वर्ल्ड कप आयोजनाला मुकणार
- बीड जिल्ह्यात कोरोनाचा कहर; दुसऱ्या दिवशीही दहा बळी
- रुग्णांना बेड मिळवून देणारा मुंबई महापालिका पॅटर्न राज्यभर राबविण्याचा राज्य सरकारचा निर्णय
- कामगारांनी स्थलांतर करु नये, राज्य शासन तुमच्या पाठीशी; कार्यभार स्वीकारताच मुश्रीफांचे आवाहन
- ‘एक नारल दिलाय दर्यादेवाला’ ट्रेंडिंग गाण्यावर मुंबई इंडियन्सचा भन्नाट डान्स ; पहा व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
