Share

‘या काळात सगळे एकत्र आहोत आणि आपण जिंकणार याची मला खात्री’ ; विरूष्का मानले चाहत्यांचे आभार

Published On: 

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा
स्थगित करण्यात आली आहे.

आयपीएलची स्पर्धा स्थगित झाल्याननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या घरी परतला आहे. महत्वाचे म्हणजे, घरी परतल्यानंतर विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासह समाजिक कार्यात हातभार लावत आहे. कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यानंतर विराट कोरोना बचाव कार्यात आपले लक्ष केंद्रीत करत आहे.

कोविड १९ रिलीफ मदतीसाठी अनुष्का आणि विराट यांनी केट्टो (Ketto) वर एक मोहीम सुरू केली होती. त्यावर प्रत्येकाने जमेल तेवढ्या पैशाचे योगदान करावे असे आवाहन देखील केले होते. कोणतीही रक्कम जीव वाचवण्यासाठी कमी नाही. परंतु या संघर्षासाठी आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. या मोहिमेत सर्वांना सहभागी होण्याची विनंती अनुष्का आणि विराट यांनी केली होती.

त्यांच्या या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ७ कोटींचा निधी जमा करण्याचे लक्ष्य विरुष्कानं डोळ्यासमोर ठेवले होते. आणि काही दिवसातच या दोघांनी कोरोनाच्या लढाईसाठी 11 कोटी रुपये जमा केले आहेत. स्वत: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने या अभियानासाठी दोन कोटी रुपये दिले आहेत.

या उपक्रमाला भारतीयांनी चांगला प्रतिसाद दिला. या उपक्रमाच्या माध्यमातून ११ कोटींचा निधी उभारण्यात आला. त्यामुळे या दोघांनी शुक्रवारी सोशल मीडियावरून चाहत्यांचे आभार मानले. आपण सगळे एकत्र आहोत आम्ही समोर ठेवलेले लक्ष्य एकदा नव्हे, तर दोनदा पार केले गेले आहे. आम्हाला आमच्या भावना सांगण्यासाठी शब्द कमी पडतील. मला देणगी देणाऱ्या सर्व लोकांचे आभार मानायचे आहेत. आपण या काळात सगळे एकत्र आहोत आणि आपण जिंकणार याची मला खात्री आहे, असे विराटने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले. त्यानंतर विराट आणि अनुष्काने एक व्हिडिओ पोस्ट करत पुन्हा सर्वांचे आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!