🕒 1 min read
Eknath Shinde । मुंबई : टीम इंडियाने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव केला. शेवटच्या चेंडूवर रविचंद्रन अश्विनने धाव घेत भारताला विजय मिळवून दिला. पाकिस्तानने भारताला विजयासाठी 160 धावांचे लक्ष्य दिले होते, विराट कोहलीच्या अप्रतिम खेळीच्या जोरावर टीम इंडियाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली. संपूर्ण जगात भारतीय संघाचे कौतुक होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच्या सामन्यामुळे प्रभावित होऊन टीम इंडियाचं कौतुक केलं आहे. याबरोबरच त्यांनीही तीन साडेतीन महिन्यांपूर्वी मॅच जिंकली असल्याचा टोला विरोधकांना लगावला आहे.
दिवाळी निमित्ताने काल ठाण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा देतानाच जोरदार फटकेबाजी केली. टीम इंडिया जिंकली हा आनंदाचा क्षण आहे. तोही उत्सव आहेच. तुम्ही पाहिलं असेल मेलबर्नमध्येही बाळासाहेबांची शिवसेना झळकली. स्टेडियममध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेचे पोस्टर झळकवण्यात आले, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले.
कालची मॅच भारताने जिंकली.(India Won Match) तशीच आम्ही तीन साडेतीन महिन्यापूर्वी एक मॅच खेळलो आणि जिंकली. या देशाने आणि महाराष्ट्राने पाहिली, अशी तुफान फटकेबाजी एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कामाचाही आढावा घेतला. लोाकांच्या मनातील राज्य आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही आल्या आल्या आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. विकासाबरोबर या गोष्टी आवश्यक आहेत. माणसाचं मन आनंदी असेल तर ऊर्जा प्रेरणा घेऊन आपल्याला पुढे जाता येतं, असंही ते म्हणाले.
त्याचबरोबर या राज्यात परिवर्तनाचं पर्व सुरू झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. हे विकासाचं पर्व असेल. या राज्याचा आपल्याला विकास करायचा आहे. जिथे जातो तिथे लोक उत्सफुर्त प्रतिसाद देत आहेत, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवर भाष्य केलं. ग्रामपंचायतीच्या निकालात भाजपला 397 जागा मिळाल्या. शिवसेनेला 298 जागा मिळाल्या. आपले सरपंच निवडून आले. ही चांगली नांदी असल्याचं शिंदेंनी म्हंटल.
महत्वाच्या बातम्या :
- Ketaki Chitale | “प्रत्येक सणापुढे हॅप्पी लिहून धर्माची माती करु नका”
- BJP | “घरात करमत नाही म्हणून ते शेतकऱ्यांच्या बांधावर येतात”; ‘या’ माजी मंत्र्याची उद्धव ठाकरेंवर टीका
- Uddhav Thackeray | “सत्ताधारांची दिवाळी, सामान्य जनतेचं काय?”, उद्धव ठाकरेंचा सवाल
- Aurangabad | एकीकडे उद्धव ठाकरेंचा दौरा अन् विरोधकांची टीका तर औरंगाबादमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या
- Eknath Shinde | “…उद्भवजींचा दौरा तासाभरात झाला”, शिंदे गटाने काव्य करत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर साधला निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
