Share

लातूरमध्ये आज पाणी परिषदेचे आयोजन

Published On: 

लातूर– जिल्हा प्रशासन आणि महापालिकेतर्फे शनिवारी (ता. 30) व रविवारी (ता. एक) येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात पाणी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी विविध कंपन्यांचे वॉटर मीटरचे प्रदर्शनही होणार आहे. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता आमदार अमित देशमुख यांच्या उपस्थितीत होणार आहे.

प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सुधाकर शृंगारे, ओमराजे निंबाळकर, माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार संजय बनसोडे, आमदार अभिमन्यू पवार, आमदार धीरज देशमुख, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार सुरेश धस उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी महापौर विक्रांत गोजमगुंडे उपस्थित राहणार आहेत.

तरी या परिषदेला नागरिकांसाठी महापालिकेतर्फे मोफत सिटीबस व्यवस्था करण्यात आली आहे. या परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, आयुक्त एम. डी. सिंह यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

https://twitter.com/Maha_Desha/status/1200650570471636994?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1200654860544118784?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1200660489182691328?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!