मुंबई : बोल्डनेस आणि आरोग्य विषयी सजग आलेली अभिनेत्री शिल्पा शेट्टी. ती अनेक कारणांनी चर्चेत असते. नुकतचं एका प्रोमोमध्ये शिल्पाच्या अप्रतिम डान्सची झलक बघायला मिळत आहे. यातील तिचा अंदाज पाहून प्रेक्षकांमध्ये तिचा हा पूर्ण परफॉर्मन्स पाहण्यासाठी उत्सुकता वाढली आहे.
दरम्यान शिल्पाने ही पोस्ट शेअर करत कॅप्शन दिलं,’ शिल्पा शेट्टी तिच्या नवीन अवतारात तुम्हाला स्तब्ध करणारा अप्रतिम परफॉर्मन्स देणार आहे.’ या व्हिडीओत शिल्पा शेट्टी एका गाण्यावर डान्स करताना दिसते आहे. हे ‘रुही’ चित्रपटामधील ‘नादियोन पार जाणा’ गाणं आहे. शिल्पाचा सिजलिंग परफॉर्मन्स पाहून चाहते फिदा झाले आहेत. व्हिडीओत तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचे दिसून आले. तिचा दमदार परफॉर्मन्स पाहून जणू आकाशातून परी अवतरल्या सारखे वाटते आहे.
https://www.instagram.com/p/CUurNnBjcaC/?utm_medium=copy_link
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय डान्स रिअॅलिटी शो’सुपर डान्सर चॅप्टर ४’ चा महाअंतिम सोहळा येत्या शनिवार -रविवारी पार पडणार आहे. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. या शोमध्ये शिल्पा शेट्टी जजच्या भूमिकेत दिसते. सध्या या शोचे अनेक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. या शोचा महाअंतिम सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक आता आतुर झाले आहेत, हे मात्र नक्की.
महत्त्वाच्या बातम्या
- राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती झाल्यानंतर चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या…
- कोरोनाळे बंद असलेली धार्मिक स्थळं पुन्हा झाली खुली; राज्यभरातील भाविकांमध्ये उत्साह
- देवेंद्र फडणवीस तब्बल ८ लाख भाजपा कार्यकर्त्यांशी ऑनलाईन संवाद साधणार
- कोळसाटंचाईमुळे वीजनिर्मितीवर परिणाम; विजेचा अनावश्यक वापर टाळण्याचे महावितारांचे आवाहन
- ‘या’ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला; तब्बल 61 गावांत कडक टाळेबंदी लागू


