Share

श्रेयस अय्यरच्या सेंचुरीवर वसीम जाफरने केले स्वतः लाच ट्रोल; म्हणाला..

Published On: 

कानपूर: युवा फलंदाज श्रेयस अय्यरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. पदार्पणाच्या कसोटीत शतक झळकावणारा तो 16वा भारतीय फलंदाज ठरला आहे. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) ने कानपूर कसोटी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावून ही कामगिरी केली. आता श्रेयसच्या या शतकानंतर त्याचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे. आता यावरच भारताचा माजी सलामीवीर वसीम जाफरने (Wasim Jaffer) ट्विटरवर पोस्ट करत स्वतः लाच ट्रोल केले आहे.

जर मुंबईच्या फलंदाजाने टीम इंडियासाठी पदार्पण केले, तर तो पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावतो, असे संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाले. मात्र भारताचा माजी सलामीवीर आणि मुंबईकडून खेळलेला वसीम जाफरने याप्रकरणी दुःख व्यक्त केले. मुंबईचे सर्वच फलंदाज पदार्पणात शतक झळकावत नाहीत, हे त्याने एका मीमद्वारे सांगितले. वसीम जाफरने ”मै हू ना” य़ा बॉलीवूड चित्रपटातील एका संवादाद्वारे स्वत: लाच ट्रोल केले आहे.

दरम्यान भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून (२५ नोव्हेंबर) कानपूरमध्ये खेळवला जात आहे. शुक्रवारी सामन्याचा दुसरा दिवस आहे. लंचनंतर भारताचा पहिला डाव 345 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून श्रेयस अय्यरने 105 धावा केल्या. शुभमन गिलने 52 आणि रवींद्र जडेजाने 50 धावा केल्या. न्यूझीलंडच्या टीम साऊदीने 5 विकेट घेतल्या. किवी संघाचा पहिला डाव सुरु झाला आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!