Share

तौक्ते वादळाने वानखेडे स्टेडियमचे आतोनात हाल; विश्वचषकाच्या आठवणीने चाहते भावूक

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर तौक्ते नावाचे चक्रिवादळ सध्या धुमाकुळ घालत आहे. राज्याची राजधानी मुंबईलाही या वादळाचा चांगलाच फटका बसला. मुंबईत अनेक ठिकाणी या वादळाचे रौद्ररुप बघायला मिळाले. याच शहरातील समुद्र किनाऱ्याला लागुन असलेल्या वानखेडे स्टेडीयमलाही या वादळाचा फटका बसला.

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या वादळामुळे मैदानातील एक स्टँड जमिनिवर कोसळले असुन उत्तर दिशेची १६ फुट उंचीची साईट स्क्रिनही जमीनदोस्त झाली. २०११ विश्वचषक स्पर्धेतपण ही स्किन कोसळली होती. असे अधिकाऱ्याने सांगितले. यादरम्यान वादळामुळे वानखेडेच्या झालेल्या अवस्थेचे अनेक फोटो सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. यावर अनेक क्रिकेट रसिकांनी २०११ च्या विश्वचषक विजयाचा साक्षिदार असलेल्या या मैदानाच्या अवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

२०११ साली झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने वानखेडे येथे झालेल्या अंतिम सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला होता. श्रीलंकेविरुद्ध या सामन्यात भारतीय संघाने ६ गडी राखुन विजय मिळवला होता. तब्बल ३२ वर्षानंतर भारतीयांना विश्वविजयाची चव चाखता आली होती. यापुर्वी भारतीय संघाने १९८३ साली कपील देवच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा विश्वचषक पटकावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!