Share

छत्रपतींसोबत वंजारी समाजाला राज्यसभेची संधी मिळतेय : पंकजा मुंडे

Published On: 

मुंबई : २६ मार्च रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. या महिन्याच्या अखेरीस रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या 3 जागांचीही घोषणा झाली आहे. त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा समावेश आहे. आता, भाजपाने तिसरे नाव सुद्धा जाहीर केले असून, त्यासाठी डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

भागवत करडा यांच्या रूपाने पहिल्यांदा छत्रपतींच्यासोबत वंजारी समाजाला राज्यसभेची संधी मिळणार असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे. पंकजा मुंडे म्हणाल्यात की, राज्यसभेच्या निवडणुकांसाठी भाजपाकडून भागवत कराड यांची निवड झाली असून, ते जनतेपर्यंत पोहचणारे नेते आहे. त्यामुळे त्यांच्या या निवडीबाबत आनंद आहे. तसेच पहिल्यांदाच छत्रपतींच्यासोबत वंजारी समाजाच्या नेत्याला राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली असून, यातून एक चांगला संदेश जाणार असल्याचं सुद्धा त्या म्हणाल्या.

मराठवाडा विकास महामंडळाचे अध्यक्ष तसेच भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. भागवत कराड हे औरंगाबादचे माजी महापौर राहिले आहे. दरम्यान या एका जागेसाठी संजय काकडे आणि एकनाथ खडसे हे दोन दिग्गज नेते उत्सुक होते पण ऐनवेळी भाजपने तिसऱ्याचं व्यक्तीला संधी दिल्याने हे मातब्बर चांगलेच नाराज असतील याबाबत काही शंका नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!