🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : सोलापुर येथील दक्षिण सोलापूर तालुक्यातील गावांनी उजनीच्या पाण्यासाठी विधानसभा मतदार निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकला होता. याबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ़ राजेंद्र भोसले यांना निवेदनही दिले होते़ मात्र आज (ता. २१) हा बहिष्कार मागे घेत मतदान प्रक्रियेत सहभागी होत नागरिकांनी मतदान केले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
उजनीच्या पाण्यासाठी अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दर्गनहळ्ळी, कर्देल्ली, धोत्री , शिरपनहळ्ळी, वडगाव, बोरामणी, वडगांव, लिंबीचिंचोळी, कुंभारी, उळे, कासेगांव, मुस्ती आदि गावांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. ही गावे दक्षिण सोलापूर तालुक्यातील असली तरी त्यांचा समावेश अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात येतो. मात्र बहिष्कार मागे घेत नागरिकांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी करत मतदानाचा हक्क बजावला.
तर, पालघरमधील वाढवण बंदर उभारणीच्या निषेधार्थ डहाणू किनारपट्टीवरील गावांनी मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी रिंगणात उतरलेले राजकीय पक्ष आणि उमेदवारांमधील तणाव वाढला आहे. तर दुसरीकडे जिल्हा प्रशासनाचीही तारांबळ उडाली आहे.
केंद्र सरकारच्या कृतीच्या निषेधार्थ वाढवण, वरोर, बाडापोखरण, गुंगवाडा, धाकटीडहाणू, तडीयाळे आणि वासगाव या किनारपट्टीवरील गावांनी आजच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याने, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार, श्रीनिवास वनगा यांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1186169750117703681?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1186170197733863424?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
