Share

राज्यसभेच्या १९ जागांसाठी आज मतदान, ज्योतिरादित्य सिंधिया यांची प्रतिष्ठा पणाला

Published On: 

नवी दिल्ली : जगभरात थैमान घालणारा करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढत असतानाच, दुसरीकडे राज्यभा निडणुकीचा बिगुल कधीच वाजला व आज देशभरातील आठ राज्यांधील १९ जागांसाठी राज्यसभेची निवडणूक पार पडत आहे. दरम्यानच्या काळात आमदारांच्या फोडाफोडीमुळे देशातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे दिसून आले. भाजपा व काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागल्याचे दिसत आहे.

देशाच्या 8 राज्यातील राज्यसभेच्या 19 जागांसाठी आज निवडणूक होणार आहे. मध्य प्रदेश, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यात काँग्रेस आणि भाजपमध्ये रंगतदार लढाई होणार आहे. यापूर्वी कोरोनाच्या महामारीमुळे 18 जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर कर्नाटकमधील 4 आणि मिझोरममधील व अरुणाचल प्रदेशच्या 1-1 जागेवर निवडणूक पार पडत आहे. या सर्वांमध्ये मध्यप्रदेशमधील कॉंग्रेसमधून भाजपमध्ये डेरेदाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया याच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

अजित दादा म्हणतात शिवसेनेसोबत काम करत असताना येणारे अनुभव…

राज्यसभेच्या 19 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 4, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी 3, झारखंडमध्ये 2 आणि मणीपूर, मिझोरम व मेघालय येथील प्रत्येकी एका जागेवर निवडणूक होत आहे. सध्या मणिपूरमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. कारण, सत्ताधआरी आघाडीतील 9 सदस्यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे, तेथील एका जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीत रंगत आली आहे. येथून भाजपाने लीसेम्बा सानाजाओबा तर काँग्रेसने टी मंगी बाबू यांना उमेदवारी दिली आहे.

कर्नाटकमधील 4 जागेवर माजी पंतप्रधान एचडी दैवेगौडा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, भाजपा उमेदवार इरन्ना काडादी आणि अशोक गस्ती हे यापूर्वीच बिनविरोध विजयी झाले आहेत. तर, अरुणाचल प्रदेशमध्येही भाजपा उमेदवार नबाम रेबिया यांनी बनविरोध विजय मिळवत भाजपाची सीट काबिज केली आहे. आज सायंकाळीच या सर्व 19 जागांसाठी मतमोजणी होऊन विजयी व पराजीत जागांचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सोशल डिस्टन्सिंगचे पालन व प्रत्येक उमेदवार आणि मतदाराचे थर्मल स्क्रीनिंग करुनच मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने तशी खबरदारी घेतली आहे.

तणाव वाढला : मोदींच्या अध्यक्षतेखाली आज सर्वपक्षीय बैठक

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!