🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: आजकाल सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे रोज आपण काही ना काही नवनवीन गोष्टी बघत असतो. यामध्ये कधी डान्स व्हिडिओ तर कधी फनी व्हिडिओंचा समावेश असतो. पण जेव्हा कॉमेडी आणि डान्स एका व्हिडिओ मध्ये एकत्र येते तेव्हा त्या व्हिडिओला वापरकर्त्यांकडून वेगळीच पसंती दिली जाते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये डान्स आणि कॉमेडी दोन्ही गोष्टी एकत्र बघायला मिळत आहे.
इंस्टाग्रामवर रिल बनवण्यासाठी लोक बॉलीवूडच्या गाण्यांवर नाचत असतात. हे व्हिडिओ बनवण्यासाठी लोक ठिकाण, जागा या गोष्टींचा विचार न करता कुठेही हे व्हिडिओ शूट करतात. यामध्ये कधी बाजारात कंटेंट क्रिएटर व्हिडिओ करताना दिसतात तर कधी भर रस्त्यावर व्हिडिओ शूट करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक मुलगी इंस्टाग्राम रिल बनवण्यासाठी भर रस्त्यावर डान्स करताना दिसत आहे.
रिक्षावाल्याने केला तरुणीचा डान्स कॉपी
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये एक मुलगी बाजारात भर रस्त्यावर ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर डान्स करत आहे. ही मुलगी विचित्र परंतु मजेदार पद्धतीने डान्स करताना दिसत आहे. आणि त्या मुलीच्या मागे एक रिक्षावाल्या तिच्या डान्सची नक्कल करताना दिसत आहे. हा रिक्षावाला अगदी मजेदार पद्धतीने त्या मुलीचे डान्स मुव्ह फॉलो करत आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात वायरल होत असून यावर मजेशीर कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
पाहा व्हिडिओ
अच्छा है आजकल रोड साइड लोगों को कंपनी मिल जाती है pic.twitter.com/PoLcw8U5Vs
— Rahool Jain (@Chilled_Yogi) October 6, 2022
व्हायरल व्हिडिओ
हा व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. @chilled_Yogi या ट्विटर अकाउंट द्वारे शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत 252 व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर लाईक्सचा पूर आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- Thackeray vs Shinde | शिंदे गटाकडून पक्षाच्या नावासाठी ३ पर्याय, ठाकरे गटाच्या चिन्हावर देखील केला दावा
- Sanjay Raut | धनुष्यबाण गोठवल्यानंतर संजय राऊतांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- Electric Scooter | डबल बॅटरी पर्यायासह ‘ही’ इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लवकरच होणार लाँच
- Bhaskar Jadhav | “फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना सांगितलं होत, संपूर्ण भाषण वाचून झाल्याशिवाय…” ; भास्कर जाधव यांची खोचक टीका
- CNG Car Update | जबरदस्त मायलेजसह ‘या’ आहेत बेस्ट CNG कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
