लातूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढली व त्याचबरोबर रुग्णांच्या शरीरातील प्राणवायूचे प्रमाण कमी होऊन रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाणही वाढले. त्यामुळे रुग्णांचा हॉस्पिटल मध्ये भरती राहण्याचा कालावधी वाढला. त्यामुळे रुग्णांना बरे होण्याकरिता खूप आर्थिक तरतूद करावी लागली. अशातच महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार म्युकरमायकोसीस या रोगावर करण्यात येत आहेत. मात्र या योजने अंतर्गत कुठलेही वाढीव बिल माफ करण्यात येत नसून त्याबद्दलचा चुकीचा संदेश सध्या समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने संदर्भात जनहित याचिका दाखल केली आहे व त्या याचिके संदर्भात उच्च न्यायालयाद्वारे कोणताही अंतिम निर्णय दिलेला नाही. या योजनेच्या लाभविषयी समाज माध्यमावर बनावट संदेश प्रसारित होऊ लागले आहेत. समाज माध्यमावरील बनावट संदेश व या योजनेतून वाढीव बिलाची रक्कम परत मिळत असल्याबद्दल कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची दिशाभूल करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे बिलाची रक्कम परत मिळण्याकरिता अर्ज देखील येत आहेत. तेव्हा जिल्हा आरोग्य प्रशासनाने जनहितास्तव स्पष्टीकरण दिले आहे, अशी माहिती महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचे विभागीय व्यवस्थापक डॉक्टर संजय घटकुल यांनी दिली आहे.
जिल्ह्यात एकूण २१ रुग्णालय महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट आहेत. यातील १३ खासगी स्वरूपाची असून त्यातील ९ रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने कोरोना रुग्णावरती उपचार करण्यास परवानगी दिलेली आहे. सध्या समाज माध्यमावर उच्च न्यायालयातील जनहित याचिकेचा संदर्भ देऊन चुकीचा संदेश प्रसारित केला जात आहे. उच्च न्यायालय किंवा राज्य सरकार कडून यासंदर्भात अद्याप कोणतेही आदेश प्राप्त झालेले नाहीत. योजनेच्या यादीत समावेश असलेल्या रुग्णालयातील बिलाबाबत तक्रार असल्यास जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, लातूर येथे अर्ज करता येतो. त्याचप्रमाणे योजनेतील कोरोना उपचाराकरिता निवडलेल्या रुग्णालयातील “आरोग्य मित्र” कडेही विहित नमुन्यात तक्रार करता येते.
महत्त्वाच्या बातम्या
- औरंगाबादसह हिंगोली मधील म्हाडाच्या सदनिकांची गुरूवारी ऑनलाईन सोडत
- ‘फक्त मराठा आरक्षणच नाही तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही केंद्राने प्रयत्न करावा’
- गंगापुरात अधिकारी-कर्मचारी गैरहजर, कार्यालयाचा झाला पंचनामा
- अनलॉकच्या दुसऱ्या दिवशी पुण्यात कोरोना रुग्णांच्या आकड्यात किंचित वाढ !
- ‘पायी वारी काढणारच, कायदा सुवस्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला शासन जबाबदार’ : बंड्यातात्या कराडकर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

