मुंबई : वांद्रे येथे मजुरांच्या उद्रेकाला जबाबदार असलेला विनय दुबे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य नाही. त्याचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, असा खुलासा राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, वांद्रे येथे गावाकडे जाण्यासाठी हजारो मजूर जमले होते. या घटनेला विनय दुबे जबाबदार असल्याचं उघड झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर तो राष्ट्रवादीशी संबंधित असल्याचंही बोललं जात होतं. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी हा खुलासा केला आहे.
विनय दुबे हा राष्ट्रवादीशी संबंधित असल्याच्या बातम्या येत आहेत. राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन करण्यासाठीच अशा पद्धतीने बातम्या पेरण्यात आल्या असून हा प्रकार दुर्देवी आहे. दुबेचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नाही, असंही मलिक यांनी स्पष्ट केलं.
वांद्रे प्रकरणानंतर दुबेला नवी मुंबई पोलिसांनी काल पहाटे ताब्यात घेतले होते. फेसबुक आणि सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या पोस्टबाबत त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.मुंबईतील वांद्रे गर्दी प्रकरणी विनय दुबेला अटक करण्यात आली होतीच. आता कोर्टाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. करोनाचा
दरम्यान,करोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास वांद्रे स्थानकाबाहेर परप्रांतीयांचा जमाव झाल्याचं पाहायला मिळालं होतं. हजारोंच्या संख्येनं परप्रांतीय या ठिकाणी जमले होते. तसंच त्यांनी आपापल्या घरी जाऊन देण्याची मागणी केली होती. दरम्यान, ही वांद्र्यातील घटना पूर्वनियोजित होती, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

