Share

गावकऱ्यांनी नियमांचे पालन करत भाजीपाला केला खरेदी

Published On: 

औरंगाबाद : सिल्लोड तालुक्यातील हट्टी गावातील लोकांनी बाजारातून भाजी-पाला खरेदी करतांना नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन करत चांगला संदेश दिला. गर्दी न करता दिवस भर थोड्य-थोड्या प्रमाणात लोकांनी जाऊन रांगेत ठराविक अंतर ठेवत भाजीपाला खरेदी केला. तसेच चेहऱ्यावर मास्क व रुमाल देखील बांधले होते.

एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केल्यामुळे मागील तीन-चार दिवसात देशभरातील अनेक शहरवासीयांनी भाजी-पाला तसेच किराणा सामान खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत संचारबंदीचे मोडले होते, तर दुसरीकडे खेडयांचे वेगळे चित्र बघायला मिळाले काही गावकऱ्यांनी संचारबंदी सुरूहोताच आपल्या गावाच्या बॉर्डर बंद करून घेतल्या तर काही गावकऱ्यांनी जीवनावश्यक सामान खरेदी करण्यासाठी अशा प्रकारे शिस्त पळून आपल्या समजदारीचे प्रमाण दिले.

कोव्हीड-१९ या संसर्गाने जगासह भारतात थैमान माजवले आहे. पूर्ण देश लॉकडाऊन केलेला असून देखील भारतातील कोरोना बाधितांची संख्या एक हजार पेक्षा अधिक झाली आहे. तर यातील सर्वात जास्त कोरोना बाधित महाराष्ट्रातील आहेत, महाराष्ट्रातील जनतेसाठी हि बाब चिंतेची असली तरी सर्वांनी संयम दाखवून नियमांचे पालन करावे अशी विनंती सरकार द्वारे केली जात आहे. सरकारच्या विनंतीचा मान राखत हट्टीतील जनतेने सरकारसह सर्वांसमोरच एक आदर्श ठेवला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!