मुंबई : राज्यसभेचा नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह भाजपचे नेते उदयनराजे भोसले, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले खासदारकीची शपथ घेतली आहे. राजीव सातव यांची खासदारकीची मराठीतून शपथ घेतली आहे. आज सकाळी अकरा वाजता हा शपथविधी सोहळा पार पडला. कोरोनाचं संकट पाहता सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचं पालन करुनच हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा कार्यक्रम राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या दालनामध्ये झाला.
महाराष्ट्रातून सर्वात आधी सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यसभेची शपथ घेतली. त्यांनी इंग्रजीतून शपथ घेतली. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजेंनीही इंग्रजीतून शपथ घेतली. पण, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष करत शपथ पूर्ण केली.
व्यंकय्या नायडूंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक, ‘जय भवानी, जय शिवाजी’ लिहून पाठवणार २० लाख पोस्ट कार्ड
उदयनराजेंनी जयघोष केल्यामुळे राज्यसभा सभापती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना समज दिला. ‘हा शपथविधी सोहळा राज्यसभेत होत नाही, त्यामुळे पटलावर रेकॉर्ड होणार नाही. हा शपथविधी माझ्या दालनात होत आहे. त्यामुळे नवनिर्वाचित सदस्य उदयनराजेंनी याबद्दल पुढे दक्षता घ्यावी’, अशी सूचनाही केली.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिलेल्या या समजावरून आता महाराष्ट्रात चांगलच राजकारण पेटलं आहे. आता कॉंग्रेसचे नेते आणि आमदार कुणाल पाटील यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. ‘निवडणुकीच्या प्रचारात ‘छत्रपतींचा आशीर्वाद’ म्हणत मतं मागितलेली चालतात . मग निवडून आल्यानंतर संसदेमध्ये छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने शपथ घेतली तर अडचण काय’? असा सवाल करत कुणाल पाटील यांनी भाजपवर आसूड ओढला आहे.
तुम्ही कितीही रेकॉर्डवरून काढा, महाराज आमच्या रक्तात आहेत – यशोमती ठाकूर
निवडणुकीच्या प्रचारात "छत्रपतींचा आशीर्वाद" म्हणत मतं मागितलेली चालतात . मग निवडून आल्यानंतर संसदेमध्ये छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने शपथ घेतली तर अडचण काय?#जय_भवानी#जय_शिवाजी
— Kunal Patil (@Kunal_R_Patil) July 22, 2020
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

