Share

माझे थकित कर्जाचे पैस माघारी देऊन खटला बंद करा, विजय मल्ल्याची भारत सरकारला विनंती

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : भारताचा मद्यसाम्राट विजय मल्ल्या याने भारत सरकारकडे थकित कर्जाचे पैस माघारी देऊन खटला बंद करण्याची मागणी केली आहे. काही वर्षांपूर्वी
आर्थिक घोटाळा आणि मनी लाँड्रींगप्रकरणी विजय मल्ल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्याने विदेशात पलायन केले.

त्यावर आता कायदेशीर कारवाई व खटला सुरु आहे. मात्र आता विजय मल्ल्याने थकित कर्जाचे पैस माघारी देऊन खटला बंद करण्याची मागणी केली आहे.  तर PM मोदींनी या पार्श्‍वभूमीवर घोषित केलेल्या आर्थिक पॅकेजची खिल्ली उडवली आहे.

त्याने ट्विटवर म्हंटले आहे की, सरकारी बँका पाहिजे तेवढे पैसे छापू शकतात. मात्र, मी १०० टक्के पैसे सरकारी बँकेला देण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, माझ्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. कोणत्याही अटीविना माझे पैसे परत घ्या आणि खटला बंद करा,’ असे मल्ल्या याने म्हटले आहे.

दरम्यान बुडित निघालेल्या किंगफिशर एअरलाईन कंपनीचा मालक विजय मल्ल्यावर घोटाळा आणि मनी लाँड्रींगप्रकरणी गुन्हा दाखल आहे. ९ हजार कोटी बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर इंग्लडहून प्रत्यर्पण (दुसऱ्या देशातून माघारी आणण्याची प्रक्रिया) करण्यासाठी भारत सरकारचे प्रयत्न सुरू असून विजय मल्ल्या कायदेशीर लढाई लढत आहे.

इंग्लडच्या उच्च न्याायालयात विजय मल्ल्या प्रत्यर्पणाचा खटला हरला आहे. त्यानंतर मल्ल्याने या महिन्याच्या सुरुवातीला तेथील सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. या आधीही मल्ल्या याने पैसे परत करण्याविषयी वक्तव्य केले होते. मात्र, बँक आणि सक्तवसुली संचलनालय याप्रकरणी दुर्लक्ष करत असल्याचे त्याने म्हटले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!