Share

प्रियसीला व्हिडीओ कॉलकरून त्याची लाईव्ह आत्महत्या

Published On: 

प्रियसीसोबत झालेल्या भांडणातून थेट तिलाच व्हिडीओ कॉलकरून प्रियकराने आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना समोर आलेय. आत्महत्या केलेल्या प्रियकराने नाव हनी आसवानी असून तो उल्हासनगरचा राहणारा आहे.

हनी आसवानीचे सात वर्षांपासून एका मुलीसोबत  प्रेमसंबंध होते. हनीला तिच्यासोबतच लग्न करायचं असल्याने त्याने तिला तशी मागणी घातली. मात्र प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्नाची तयारी केली होती. त्यामुळे सात वर्षांच्या प्रेमसंबंधांनंतर त्यांचं ब्रेकअप झालं.

21 मे रोजी हनी आणि तरुणीची मुंबईतील एका हॉटेलमध्ये शेवटची भेट झाली होती. यावेळी लग्नाच्या मुद्द्यावरुन दोघांमध्ये वादही झाले. त्यामुळे चिडून घरी आलेल्या हनीने प्रेयसीला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ कॉल करुन आत्महत्येची धमकी दिली. त्यावर तिने आत्महत्या करुन दाखव, असं आव्हान दिल्याने हनीने व्हिडीओ कॉल दरम्यानच आत्महत्या केली.

तब्बल 20 दिवसांनंतर हा संपूर्ण प्रकार हनीचे वडील नरेश आसवानी यांना समजला. त्यानंतर त्यांनी हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये 18 जून रोजी हनीच्या प्रेयसीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!