मुंबई : लोककलावंत सुरेखा पुणेकर व गायिका देवयानी बेंद्रे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा सुरु होती. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले होते. त्यात आज सुरेखा पुणेकर यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले कि, सुरेखाताईं पुणेकर यांचे मंचावरील काम उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहे. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेब मुख्यमंत्री असल्यापासून राज्यसरकारने कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. त्यानंतरही महाराष्ट्राच्या अनेक मुख्यमंत्र्यांनी कलेची जपणूक करण्याची ही परंपरा सुरु ठेवली.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जसे सर्व जाती – धर्मातील लोक आहेत त्याप्रमाणेच विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा देखील सहभाग असला पाहिजे ही आदरणीय शरद पवारसाहेबांची भूमिका आहे. आज प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे मी पक्षात स्वागत करतो. काही जणांना विविध संघटनांमध्ये वा इतर ठिकाणी सामावून घेतले जाईल. त्याठिकाणी त्यांनी काम करावे. तसेच पुढील काळात जिल्हा परिषद, सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहनही केले.
तर या जाहिर प्रवेशानंतर सुरेखा पुणेकर म्हणाल्या, ‘राष्ट्रवादीत प्रवेश करुन मला आनंद झाला आहे. माझं स्वप्न होतं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे, ते आज पूर्ण झालंय. दरेकरांनी जे म्हंटले ते ऐकून वाईट वाटलं, त्या वक्तव्याचा मी निषेध करते. राष्ट्रवादी काँग्रेस हा महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. प्रवीण दरेकर फार चुकीचं बोलले. त्यांना महिलांचा आदर करता येत नसेल तर अवहेलना तरी करु नका. त्यांनी जाहीर माफी मागावी. अन्यथा त्यांना खूप त्रास होईल. असा इशाराही पुणेकर यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत वेगवेगळ्या तज्ज्ञांशी चर्चा करुन आम्ही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला’
- भारतीयांची मास्कपासून सुटका नाहीच; व्ही के पॉल म्हणाले…
- भाजप-संभाजी ब्रिगेड युतीची चर्चा; संतोष शिंदे म्हणाले, ‘वैचारिक लढा चालूच राहील,परंतु…’
- जम्मू काश्मीर पर्यटकांसाठी शंभर टक्के सुरक्षित; पर्यटन संचालकांनी दिली माहिती
- स्पुटनिक लाईटच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी डीसीजीआयकडून मंजुरी


