औरंंगाबाद : शहर परिसरात वाहन चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून चोरट्यांनी शहराच्या विविध भागातून दोन दुचाकींसह एक कार चोरून नेली. प्रताप शिवाजी ओगले (वय २६,रा.गंगापूर) यांची कार क्रमांक (एमएच-१५-बीडी-१४२७) चोरट्याने २२ जुलैच्या रात्री घराजवळून चोरून नेल्याचा प्रकार २३ जुलै रोजी सकाळी उघडकीस आला.
अभिषेक सुभाषराव धुमाळ (वय ३४,रा.गारखेडा परिसर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-एआर-५६७६) चोरट्याने १६ जुलै रोजी घराजवळून चोरून नेली. आकाश विजय डोईफोडे (वय २८,रा.द्वारकादासनगर) यांची दुचाकी क्रमांक (एमएच-२०-बीझेड-१४७५) चोरट्याने २१ जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घराजवळून चोरून नेली.
शहराच्या विविध भागातून वाहन चोरी करणाऱ्या चोरट्याविरूध्द अनुक्रमे एमआयडीसी वाळूज, पुंडलिकनगर आणि सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- निवडणुकीत पत्नीचा पराभव झाल्याने आ.सुरेश धसांनी विरोधी महिला उमेदवाराचे हॉटेल पाडले
- ‘उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचे! ते मुख्यमंत्री झाल्यापासून कोरोना आला, वादळं आली’
- अन् अतिवृष्टीने झालेले नुकसान पाहून खा. नवनीत राणांना अश्रू अनावर, पाहा हा व्हिडिओ..
- ‘तुम्हाला पायावर उभं करण्यासाठी सरकार तुमच्या पाठीशी’, मुख्यमंत्र्यांचा नुकसानग्रस्तांना विश्वास
- चिपळूणच्या नुकसानग्रस्त नागरिकांचा मुख्यमंत्र्यांसमोरच संताप, पाहा व्हिडिओ..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

