Share

राष्ट्रवादीच्या ‘या’ बाहुबली नेत्याला झाली कोरोनाची लागण

Published On: 

परभणी-राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक सवर्सामान्य नागरिकांसह सेलिब्रेटी,राजकीय नेते देखील कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. यातच आता राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना कोरोना विषाणु संसर्ग झाला आहे. औरंगाबाद येथे करण्यात आलेल्या रॅपीट अॅन्टीजन टेस्टमध्ये ही धक्कादायाक बाब समोर आली आहे.

आमदारांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आल्यानंतर त्यांच्या दररोज संपर्कात असलेल्या समर्थकांचे मात्र धाबे दणाणले आहे. दरम्यान, शनिवारी (ता. १८) दुपारी त्यांच्या पाथरी येथील निवासस्थानाचा परिसर प्रतिबंधित घोषित करण्यात आला आहे.

बाबाजानी दुर्राणी यांना कोरोना झाला आहे, या वृत्ताला परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. दुर्राणी यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या एका खाजगी रूग्णालयात दाखल केलं गेलं आहे. दरम्यान, सध्या बाबाजानी दुर्राणी यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. दुर्राणी लवकरच कोरोनावर मात करून लोकहिताचं काम करण्यासाठी सज्ज होतील, असा विश्वास परभणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

बाबाजानी दुर्राणी यांची फेसबुक पोस्ट

प्रिय सहकाऱ्यांनो, सर्दी, ताप असल्या कारणाने मी कोविड-१९ची टेस्ट केली असता कोरोना पॉझिटिव्ह झाल्याचे कळले. औरंगाबाद येथील रुग्णालयात मी उपचार घेत आहे, आता माझी प्रकृती एकदम स्थिर असून कोणीही काळजी करू नये. आपल्या सर्वांचे असंख्य आशीर्वाद व सदिच्छा माझ्या पाठीशी आहेत, त्या जोरावर लवकरच मी पूर्णपणे बरा होऊन परत येईल.

तुम्हा सर्वांचं प्रेम आहे, त्याबद्दल मी ऋणी आहे परंतु कोणीही मला संपर्क करण्याचा व भेटण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती. तुम्ही सर्वजण आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, विनाकारण घराबाहेर पडू नका आणि प्रशासनास सहकार्य करा.- आपला आ.बाबाजानी दुर्राणी.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!