टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते पक्षांतर करत आहेत. तसेच काही नेत्यांची नाव चर्चेत आहेत. त्यापैकी एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे देखील नाव पक्षांतर करणाऱ्या नेत्यांच्या चर्चेमध्ये आहे. मात्र खुद्द आता शिवेंद्रराजे यांनी खोचक टिपणी करत पक्षांतराच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. शिवसेना शहर अध्यक्ष सचिन जवळ यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
आता सर्वांच्या मतानुसार माझे सर्व पक्ष झाले आहेत. फक्त आता वंचित आघाडी एवढाच पर्याय उरलाय. मग काय करायच तोच पर्याय योग्य वाटतोय, असे म्हणत शिवेंद्रराजे यांनी उपस्थितांच्या चर्चांना आळा घातला.
दरम्यान शिवेंद्रराजे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. कारण लोकसभा निवडणुकीवेळी सातारचे लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांची त्यांनी भेट घेतली होती. त्यामुळे अनेकांनी या भेटीचा निष्कर्ष पक्षांतर असा काढला. मात्र तसे काही झाले नाही. तसेच शिवेंद्रराजे लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर त्यांनी लोकसभेतून माघार घेतली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
