Share

‘राहुल गांधींच्या पूर्वजांच्या काळात ५० वर्षांनी लस यायची’, मीनाक्षी लेखींचा टोला

Published On: 

नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्ण कमी असले तरी कोरोनाचे संकट कमी झालेले नाही. असे विधान नुकतेच ‘मन की बात’ या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले. त्यांनी लसीकरण करण्याचे आवाहन देखील केले. लसीकरण देशात कसे सुरु आहे. या विषयावर कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक सोशल मिडिया पोस्ट केली. त्यात त्यांनी सरासरी लसीकरण फक्त ३.६ कोटी प्रती दिवस होत आहे. पण ते ९.३ कोटी प्रती दिवस असे सांगितले. तसेच त्यांनी त्या पोस्टवर ‘अगर समझते देश के मन की बात, ऐसे ना होते टीकाकरण के हालात।’ असे लिहित मोदींवर निशाना साधला.

याला प्रत्युतर देत केंद्रीय मंत्री मीनाक्षी लेखी यांनी गांधी परिवारावर टीका केली आहे. ‘जर राहुल गांधींसारखे नेते गरज पडताना देशाच्या सेवेत गुंतले असते तर लसीची ही अवस्था झाली नसती. त्यांच्या पूर्वजांच्या काळात 50-50 वर्षांनंतर लस या देशात येत होती, अशा त्या म्हणल्या. या पूर्वी दिल्लीमध्ये ‘मोदी जी आमच्या लेकरांची लस परदेशात का पाठवली?’ असे पोस्टर्स लावल्यानंतर दिल्ली पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनी म्हटले की हेच पोस्टर मी शेअर केलं आहे आता मला अटक करा.

दरम्यान, लसीकरण हा मुद्दा भारतात कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी महत्वाचा आहे. एकट्या महाराष्ट्रात ४ कोटी २० लाख पेक्षा अधिक लसीकरण झाले. तज्ञांच्या मते भारतातील प्रत्येक नागरिकाला येत्या वर्षाच्या पहिल्या महिन्या पर्यंत लसीकरण झालेले असेल. मात्र, राहुल गांधीनी सांगितलेल्या आकडेवारी नुसार २०२२ पर्यंत हे लसीकरण लांबणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!