Share

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल कोट्यातून आमदार होणे शक्यच नाही’

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर निवडले जावेत असा निर्णय नुकताच अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यामुळे सरकारवरच संकट टळल असं मानलं जात आहे.

परंतु आता, राज्यपाल कोट्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमदार होण्यास आमचा विरोध नाही. त्याची घटनात्मक चर्चा व्हायची ती होईल. मात्र ते शक्यच नाही. घटनात्मकदृष्ट्या तसं होऊ शकत नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.

पुढे ते असही म्हणाले, माझा मुद्दा वेगळा आहे. दिवा लावायला विरोध, टाळ्या वाजवायला विरोध, जे अत्यावश्यक सेवा करतात त्यांचं कौतुक करायला विरोध. उद्योगपती वाधवानला मात्र महाबळेश्वरला पाठवायला विरोध नाही. त्याबाबत बोललं की ते राजकारण झालं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

अजूनही दोन महिने आहेत. दोन महिन्यानंतरच अशी स्थिती येईल की आमदार नाही झाले तर उद्धव ठाकरेंना राजीनामा द्यावा लागेल. मग आता मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणण्याची काय गरज होती?, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

आमचा उद्धवजींना राज्यपाल कोट्यातून आमदार होण्याला विरोध नाही, त्याची जी घटनात्मक चर्चा व्हायची ती होईल. पण ते शक्यच नाहीय, घटनात्मकदृष्ट्या ते होऊच शकत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. घटनात्मक तरतूदीनुसार उद्धव ठाकरे यांना शपत घेतल्या पासून ६ महिन्यांच्या आत कायदेमंडळाच्या कोणत्याही एका सभागृहावर सदस्य होणे बंधनकारक आहे. आता पाटील यांच्या दाव्यानंतर सरकारच्या भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!