🕒 1 min read
तुळजापूर – उस्मानाबाद तालुक्यातील चिखली या गावचा रहिवासी असलेल्या आणि सध्या सोलापूर येथे सेवेत असलेल्या आणि नुकतीच सुट्टी संपवून सोलापूर येथे गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. बाहेरुन आलेल्या व्यक्ती कोरोना पाँजीटीव्ह निघाल्याने कोरोना मुक्त म्हणवणारा उस्मानाबाद जिल्हा पुनश्च कोरोना चा कचाट्यात अडकण्याची शक्यता निर्माण झालीआहे,
याबाबत अधिक माहिती अशी की,उस्मानाबाद तालुक्यातील चिखली येथील पोलीस कर्मचारी २४ एप्रिल च्या दरम्यान सुट्टीनिमित्त गावी आला होता.येथे काही दिवस थांबला होता त्यानंतर तो सोलापूर येथे गेल्यानंतर त्याची चाचणी घेतली ती पाॅझिटीव्ह आली आहे. यांच्या बरोबरच ज्याचा संपर्क आला आहे अशा लोकांना उस्मानाबाद येथे तपासणीसाठी आणुन त्यांचे स्वँब नमुने घेतले आहेत. चिखली हे गाव सिल केले असून या मुळे प्रशासन अधिक सर्तक बनला आहे .
उस्मानाबाद जिल्हयात रविवारी जनता कर्फ्यु-
उस्मानाबाद जिल्ह्यात सद्यस्थितीत एक ही कोरोना ऍक्टिव्ह केस नाही परंतु शेजारच्या सोलापूर जिल्ह्यात शंभरपेक्षा अधिक कोरोना बाधित रुग्ण आहेत त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी उस्मानाबाद जिल्ह्यात रविवार दिनांक 3 मे 2020 रोजी जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी केले आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

