Share

ध्वनिक्षेपक वापर मुंबईत ‘गणपती’त ४ दिवस, नवरात्रीत २ दिवस सूट

Published On: 

मुंबई : मुंबई शहर आणि जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्याच्या मर्यादेतून सूट देण्याबाबतचे १५ दिवस मुंबई शहर जिल्हाधिकारी यांनी जाहीर केले आहेत. उद्यापासून सुरु होणारा गणपती उत्सव चार दिवस (दुसरा दिवस, पाचवा दिवस, गौरी विर्सजन व अंनत चर्तुदर्शी), नवरात्री उत्सव दोन दिवस (अष्टमी व नवमी) दिवाळी एक दिवस (लक्ष्मीपूजन) ख्रिसमस एक दिवस, ३१ डिसेंबर एक दिवस या दिवसासाठी श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष या ठिकाणी ध्वनिवर्धक सकाळी ६ ते रात्रौ १२ वाजेपर्यंत वापरण्याची सूट असेल. ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यासंदर्भात मा. उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदुषणासंदर्भात दिलेले आदेश, ध्वनी प्रदुषण २०००मधील नियम ३ व ४ चे पालन, केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदुषण नियम २०००च्या अधिसूचनेनुसार पालन करणे संबधितांवर बंधनकारक आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!